Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शौर्य पाटील जीवन संपविणे प्रकरणी दिल्ली सरकारचे चौकशीचे आदेश

शौर्य पाटील जीवन संपविणे प्रकरणी दिल्ली सरकारचे चौकशीचे आदेश


नवी दिली : शौर्य पाटील या १६ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर दिल्ली सरकारने कोलंबस शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक हर्षित जैन यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

ही समिती ३ दिवसात अहवाल सादर करणार आहे. दुसरीकडे शाळेनेही ४ शिक्षकांना निलंबित केले आहे.

समितीमध्ये कोण?
हर्षित जैन - अध्यक्ष

अनिल कुमार - सदस्य

पूनम यादव - सदस्य

कपिल कुमार गुप्ता - सदस्य

सरीता देवी - सदस्य

शौर्य पाटील जीवन संपविणे प्रकरणी कोलंबस शाळेने चार शिक्षिकेला निलंबित केले. यामध्ये अपर्जिता पाल, मनु कालरा, युक्ती महाजन आणि जुलि वर्गेसा यांचा समावेश आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू असेल तोपर्यंत हे शिक्षक निलंबित असणार आहेत.

शाळेच्या आवारातही या शिक्षिकांना प्रवेश करण्यात बंदी घालण्यात आली. विद्यार्थी, पालक आणि शाळेतील कोणत्याही कर्मचा-यांशी त्यांना चर्चा करता येणार नाही. शाळेतील विद्यार्थ्यांना भेटता येणार नाही. मात्र निलंबनाच्या कालावधी दरम्यान किंवा कुठल्याही प्रकारच्या तपासासाठी बोलावले तर त्यांना हजर राहावे लागणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.