जम्मू-कश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड अशा पर्वतीय राज्यांमध्ये हिमवर्षा होत आहे. केवळ पर्वतखंडांपुरता मर्यादित राहिलेला नसून बंगालच्या पूर्वोत्तर भागांमध्येही जलस्त्रोत गोठण्याच्या चर्चेचे वातावरण आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवत आहे. राज्यात तापमान झपाट्याने खाली आले आहे. धुळे हे राज्यातील सर्वात थंड ठिकाण बनले आहे. धुळ्यात तापमान 6.2 °C इतके खाली आले आहे. परिणामी राज्यातील काही भागात 'कोल्ड वेव्ह'चा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या भागात सर्वाधिक थंडी जाणवणार? मुंबईच्या हवामानाची काय स्थिती? हे जाणून घेऊ या...हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः धुळे, नाशिक, जळगाव, निफाड अशा जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे लोकांमध्ये हुडहुडी वाढली आहे. अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा खूप खाली गेले आहे. ही थंडी पुढील 1-2 दिवसांपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मुंबईसुद्धा गारठली
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील गारठा जाणवू लागला आहे. सांताक्रूझ येथे IMD च्या मापनानुसार किमान तापमान 17.4 °C नोंदवले गेले आहे. या मौसमातील हे सर्वात कमी तापमान आहे.
राज्यात थंडीचा कडाका, तापमानात मोठी घट...
उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यात तापमान 6.2 °C इतके खाली आले आहे. नाशिक जिल्ह्यात 9.2 °C इतका किमान तापमान नोंदवला गेले आहे. पुणे जिल्ह्यात 9.4 °C तापमान आहे तर कोल्हापूर, महाबळेश्वर, सोलापूर, रत्नागिरी हे इतर भाग देखील रात्री मोठा गारठा जाणवत आहे.
विशेष काळजी घेण्याचे आवाहन
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शीतलहरींचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करून थंडीपासून बचाव करावा तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
22 नोव्हेंबरला पावसाची शक्यता...
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये अधिक थंडीचा अनुभव येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे 22 नोव्हेंबरला पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण होत आहे. यामुळे काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.