बारामतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील घराबाहेर अघोरी पूजा करण्यात आली आहे. फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य रस्त्याच्या मधोमध ठेवत अघोरी पूजा केल्याचा प्रकार घडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही अघोरी पूजा कुणी केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आली. अजित पवारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य ठेवण्यात आल्याचे दिसून आले. आज सकाळी सहयोग सोसायटीच्या समोर अघोरी पूजा करून भानामतीचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी हा जादूटोणाचा प्रकार पाहिला त्यानंतर बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली. निवडणूकीच्या तोंडावर असा प्रकार घडल्याने बारामतीमधील नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. काही वेगळेचं करण्याच्या हेतुने हा प्रकार केल्याची जोरदार चर्चा बारामतीत सुरू आहे. निवडणूकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने कुणाचे तिकीट मिळवण्यासाठी किंवा कुणाचे तिकीट कापण्यासाठी हा प्रकार केला की काय? अशा देखील चर्चा सध्या बारामतीमध्ये होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.