प्रवीण तरडे यांची मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट! अमली पदार्थ विरोधी कारवाईचे तरडे यांच्याकडून कौतुक पहा VIDEO
मुळशी पॅटर्न सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट दिली. पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे स्वागत केले..
यावेळी तरडे म्हणाले "मी माझ्या कोणत्याही चित्रपटात व्यसनांचं प्रदर्शन करत नाही. अंमली पदार्थांवर सर्वात जास्त कारवाई केलेल्या मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आल्यानंतर मी फार आनंदी झालो आहे. या पोलीस ठाण्याचे काम कौतुकास्पद आहे" अशा शब्दात दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कामाचं कौतुक केले. तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचीही प्रशंसा केली. व्यसनमुक्ती बाबत कार्यक्रम आयोजित करा मी मिरजेला पुन्हा नक्की येईन असे ही दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने आणि चित्रपट निर्माते सागर पाठक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.