पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
माजी क्रिकेटपटू, माजी पंतप्रधान इम्रान खान याची तुरुंगात हत्या झाल्याची बातमी पसरल्याने पाकिस्तानात मोठा गदारोळ सुरु झाला आहे. इम्रान खान याचे समर्थक, कुटुंबीय अदियाला तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणावर जमले असून ८ डिग्री तापमान असलेल्या रात्री देखील तुरुंगासमोरून तसूभरही हललेले नाहीत. अशातच खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांना रावळपिंडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटायला गेलेल्या खैबर-पख्तूनख्वा राज्याचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांच्यावर रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर गुरुवारी धक्कादायक घटना घडली आहे. इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आलेल्या अफरीदींना पोलिसांनी रस्त्यावर पाडून मारहाण केली. अफरीदी यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सैन्याच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.गुरुवारी सोहेल अफरीदी जेव्हा अदियाला तुरुंगाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. पीटीआय समर्थकांची गर्दीही वाढत असल्याने तणावाचे वातावरण होते. अफरीदींच्या आगमनामुळे परिस्थिती अधिक चिघळली. पोलिसांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी झालेल्या धक्का-बुक्कीमध्ये, पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर पाडत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पीटीआय पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, ही लोकशाही अधिकारांवरचा थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.