Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्रांचे पार्सल घेऊन जाताना सिकंदरला अटक केली, स्पर्धा होऊ नये म्हणून षडयंत्र, राष्ट्रावादीच्या उमेश पाटलांचा मोठा दावा

मित्रांचे पार्सल घेऊन जाताना सिकंदरला अटक केली, स्पर्धा होऊ नये म्हणून षडयंत्र, राष्ट्रावादीच्या उमेश पाटलांचा मोठा दावा

महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील चुरशीच्या पैलवानाकडून गुंतवण्याचे षडयंत्र सुरू आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला आहे.

सिकंदर शेख बाबतीतला संपूर्ण विषय हा संशयास्पद आहे. त्याने पंजाब आणि हरियाणातील अनेक पैलवानांना धूळ चारली आहे. त्यामुळं द्वेष किंवा भविष्यातील स्पर्धा होऊ नये यासाठी तर हे षडयंत्र नाही ना? याचा तपास झाला पाहिजे असे उमेश पाटील म्हणाले. मित्रांचे पार्सल घेऊन जाताना त्याला अटक करण्यात आली आहे. पार्सलमध्ये काय होतं याची सूतराम कल्पना सिकंदरला नव्हती, असा दावा उमेश पाटील यांनी केला आहे.

वर्षाला सिकंदर कुस्त्यातून 4 ते 5 कोटी रुपये कमावतो, त्याच्याकडे 14 थार

सिकंदरने असं कृत्य केलं असेल याच्यावर महाराष्ट्रचा विश्वास नाही असे पाटील म्हणाले. वर्षात तो सुमारे कुस्त्यातून 4 ते 5 कोटी रुपये कमावतो, 14 थार, बाईक बक्षीस मिळवलं आहे. त्यामुळे काही पैशासाठी सिकंदरला अडकवण्याचे प्रयत्न तर नाही ना? असा सवाल देखील उमेश पाटलांनी उपस्थित केला आहे. मी सिकंदरला क्लीन चीट देत नाही पण या प्रकरणात संशयला जागा आहे असे उमेश पाटील म्हणाले.

महाराष्ट्र भूषण असलेल्या या पैलवानचा बळी जाऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी

मित्रांचे पार्सल घेऊन जाताना त्याला अटक करण्यात आल्याचा दावा उमेश पाटील यांनी केलाय. पार्सलमध्ये काय होतं याची सूतराम कल्पना सिकंदरला नव्हती. त्यामुळं महाराष्ट्र भूषण असलेल्या या पैलवानचा बळी जाऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, त्यांनी लक्ष घालायला हवं असे पाटील म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.