अकोला : दिल्ली स्फोट हे सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. सरकार मस्तीत आले होते. दिल्ली स्फोटात अंतर्गत की बाह्य शक्तीचा हात आहे? असा प्रश्न निर्माण होतो. ते म्हणतील की, अंतर्गत स्फोट झाले नाही, पण अंतर्गत स्फोट झाले आहेत.
अंतर्गत स्फोटामध्ये जे काही साहित्य सापडले, ते संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडले आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. सखोल चौकशी होऊन या प्रकारच्या घटना थांबल्या पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात माध्यमांशी बोलतांना दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणावर भाष्य केले. या घटनेवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. संघ स्वयंसवेकांवर देखील त्यांनी आरोप केले. दिल्ली येथे लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या जवळ सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काही जणांच्या शरीराचे तुकडे झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधला. दिल्लीतील स्फोट हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला. या स्फोटामागे अंतर्गत शक्ती की बाह्य शक्ती? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. स्फोटामध्ये सापडलेले साहित्य संघ कार्यकर्त्यांकडे देखील सापडल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी करून या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली. ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या धक्कादायक आरोपाने खळबळ उडाली आहे.
दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज नाही; अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर पालिकांमध्ये उमेदवारी जाहीर होण्याची प्रतिक्षाचनरेंद्र मोदींमुळे मला एकट्याला लढावे लागते; मविआचे तेच सूत्रधारमहाविकास आघाडीचे कर्ता, धर्ता व सूत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मी राजकारणात काय करू शकतो? १९८९ मध्ये दाखवून दिले. त्यावेळी भाजप देखील होती. नरेंद्र मोदी असेपर्यंत मला एकट्यालाच लढावे लागणार आहे, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. भाजप एका पायावर मैत्री करण्यासाठी तयार आहे. पण त्यांच्यासोबत आम्हीच मैत्री करायला तयार नाही, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. सगळ्यांच्या दोऱ्या नरेंद्र मोदींच्या हातात आहेत. ॲड. आंबेडकरांना सोबत घेऊ नका, अन्यथा तिहार कारागृह तुमच्यासाठी मोकळे आहे, असा संदेश नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिल्याचा दावाही त्यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.