संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटर स्मृती मानधना यांचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीने पलाश मुच्छलसोबतच्या कथित चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले. हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी पलाश तसेच मेरी या दोघांवरही टीका करत आहेत. पलाशने स्मृतीला अंधारात ठेवले. तिला धोका दिला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. सोबतच मेरीने लग्न पुढे ढकलल्यानंतरच का स्क्रीनशॉट शेअर केले? असा सवालही केला जात आहे. असे असतानाच मेरीने आता पलाशसोबतच्या कथित चॅटिंगविषयी अधिक माहिती दिली आहे. यासह पलाशला भेटले होते का? स्क्रीनशॉट का व्हायरल केले, याबाबतही तिने सविस्तर माहिती दिली आहे.
चॅटिंगचे स्क्रीनशॉट झाले व्हायरल
मेरी डिकॉस्टाची नवी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने बरंच काही लिहिलं आहे. विशेष म्हणजे पलाशसोबत चॅटिंग करणारी मीच असून मीच ते स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत, असेही तिने सांगितले आहे. यासह तीने मी कोरिओग्राफर नाही. पलाशसोबत माझे कोणतेही नाते नव्हते, असेही मेरीने स्पष्ट केले आहे.
किती काळ चॅटिंग केली?
मेरीने आपल्या या पोस्टमध्ये पलाशसोबत नेमके किती काळ चॅटिंग केली याबाबतही माहिती दिली आहे. "मला माझी ओळख सार्वजनिक करायची नाही. पण पलाशसोबतच्या चॅटिंगचे फोटो मीच व्हायरल केले आहेत. ही चॅटिंग 2025 सालातील मे आणि जुलै महिन्यातील आहे. ही चॅटिंग फक्त एक महिना चालली. कोणत्याही पद्धतीने मी त्याच्यात गुंतलेली नाही. मी त्याला भेटलेली नाही," असे मेरीने स्पष्ट केले आहे. सोबतच मला पलाशला उघडे पाडायचे होते. मला तो कोण आहे हेदेखील माहिती नव्हते, असेही मेरीने स्पष्ट केले आहे. मी स्मृती मानधानाचा आदर करते. मला फक्त या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या, अशा भावना मेरीने व्यक्त केल्या आहेत.
मला टार्गेट करू नका
सोबतच पुढे मेरीने मीच पलाशकडे दुर्लक्ष केले, असेही तिने स्पष्ट केले. मी कोणत्याही महिलेशी कधीही वाईटपणे वागणार नाही. मला कोणीही लक्ष्य करू नये. मला अशा परिस्थितीतून जावे लागल, याची मला कल्पनाच नव्हती, असे म्हणत तिने नेटकऱ्यांनी टार्गेट न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पलाशच्या बाजूने नेमके काय स्पष्टीकरण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.