ब्रेकिंग न्यूज! महिलेचा कोल्हापूरच्या पुरूषावर बलात्कार, अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, पुण्यातील खळबळजनक घटना
महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याच्या घटना पुण्यात घडली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. महिलेकडून अश्लील फोटो अन् व्हिडिओ दाखवत पुरूषाकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असेही सांगण्यात येत आहे. पुरूषावर बलात्कार केल्याची घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका व्यक्तीवर अत्याचार केला आहे. अत्याचार करतानाचे पुरूषासोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ महिलेने काढले. त्याचाच वापर करून सविता त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. मी वकील आहे, अशी धमकीही त्या महिलेने त्याला दिली होती. पुण्यातील महिलेचे राहते घर, कोल्हापूर येथील फिर्यादीचे घर घेण्यासाठी पुरुषावर बळजबरीचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुरुषाला बळजबरीने काशी विश्वनाथ या ठिकाणी घेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.