Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्मृतीने पलाशला कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याचा खळबळजनक दावा, तो फक्त...

स्मृतीने पलाशला कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याचा खळबळजनक दावा, तो फक्त...


मुंबई : विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाह रविवारी संगीतकार प्रियकर पलाश मुच्छल याच्यासोबत होणार होता. परंतु स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास यांची तब्येत अचानक ढासळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे स्मृती-पलाशचा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. श्रीनिवास यांना डिस्चार्ज मिळाला असला तरीही अद्याप लग्नाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


बॉलिवूड अभिनेता केआरके अर्थात कमाल आर खान याने सोशल मीडियावरुन यावर भाष्य केलं आहे. "बातम्या बाहेर येत आहेत. स्मृती मानधना हिने लग्न समारंभात होणारा पलाश मुच्छल याला एका कोरिओग्राफर मुलीसोबत रंगेहाथ पकडलं. साला कमाल का टोपीबाज आदमी है. म्हणजे तो फक्त प्रसिद्धीसाठी मानधनासोबत लग्न करत होता." अशी टीका कमाल आर खान याने मंगळवारी 'एक्स' सोशल मीडियावरुन केली आहे. यावरुन काही जणांनी केआरकेलाच झोडून काढलं आहे, तर कुणी त्याच्या प्रतिक्रियेवर विश्वास ठेवत पलाश मुच्छलवर टीका केली आहे. 
स्मृती-पलाश हे दोघं रविवार २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत लग्न करणार होते, मात्र त्याच सकाळी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं जाणवल्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. त्याचवेळी नवरदेव पलाश मुच्छल यालाही तणावामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

अशातच नेटिझन्सनी आपापल्या थिअरी मांडण्यास सुरुवात केली. कोणी स्मृतीच्या वडिलांना बोल लावले, तर कुणी पलाशवर फसवणूक केल्याचा आरोप केला. अर्थात या निराधार चर्चांना कुठूनही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. मात्र पलाशचे एका तरुणीशी फ्लर्टिंग करतानाचे कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. या खळबळ उडवणाऱ्या बातमीने पलाश-स्मृतीच्या लांबलेल्या लग्नाच्या गोष्टीत मसाला घातला. मात्र स्मृती अथवा तिच्या निकटवर्तीयांकडून या निराधार दाव्यांवर भाष्य करण्यात आलेले नाही.
दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन स्मृती आणि पलाशच्या नात्याबाबत सोशल मीडियावर सुरु असलेल्या कुठल्याही चर्चांना अधिकृत दुजोरा देत नाही. निव्वळ व्हायरल स्क्रीनशॉट आणि त्यावर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान याने केलेल्या ट्वीटच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.