Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News! पैसा बोलला! ५१०० कोटींच्या बदल्यात CBI-ED चे सगळे खटले रफादफा, मात्र... सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Big News! पैसा बोलला! ५१०० कोटींच्या बदल्यात CBI-ED चे सगळे खटले रफादफा, मात्र... सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय


सर्वोच्च न्यायालयाने स्टर्लिंग बायोटेक बँक घोटाळा प्रकरणात मोठा निर्णय देत फरार आरोपी नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेली सर्व फौजदारी कारवाई थांबवण्यास सोमवारी हिरवा कंदील दिला. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी त्यांना येत्या १७ डिसेंबरपर्यंत बँकांना एकरकमी सेटलमेंट (OTS) स्वरूपात ५,१०० कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

एकूण कथित फसवणूक ५,३८३ कोटींहून अधिक

न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, रक्कम जमा झाल्यानंतर सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत दाखल सर्व खटले कायमस्वरूपी बंद केले जातील. हा निर्णय केंद्र सरकारने बँकांच्या एकरकमी सेटलमेंट प्रस्तावाला दिलेल्या अधिकृत मान्यतेनंतर आला आहे. या प्रकरणातील एकूण कथित फसवणूक ५,३८३ कोटींहून अधिक आहे.

बँक फसवणूक
"सार्वजनिक पैशाची वसुली हाच या खटल्यांचा मूलभूत उद्देश आहे. जर पूर्ण रक्कम बँकांना परत मिळाली, तर फौजदारी कारवाई पुढे चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही," असे न्यायालयाने आपल्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या १२ पानी आदेशात नमूद केले. न्यायालयाने यापूर्वीच अनेक सुनावणीत हेच मत व्यक्त केले होते की, जर आरोपी ठरलेली OTS रक्कम भरून सार्वजनिक बँकांचे पैसे परत करायला तयार असतील तर गुन्हेगारी कारवाईचा उद्देश संपतो.

दरम्यान, न्यायालयाने अत्यंत काळजीपूर्वक हेही नमूद केले की, हा निर्णय या प्रकरणाच्या अत्यंत विशेष परिस्थितींमुळेच दिला गेला आहे आणि भविष्यातील इतर बँक फसवणूक किंवा आर्थिक गुन्हे प्रकरणांत याचा दाखला म्हणून वापर करता येणार नाही.

बँकांची हजारो कोटींची कर्जे बुडवल्याच्या आरोप

वडोदरा येथील स्टर्लिंग बायोटेकचे संदेसरा बंधू औषधनिर्माण क्षेत्रापासून ऊर्जा क्षेत्रापर्यंत पसरलेल्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक आहेत. २०१७ मध्ये देशांतर्गत बँकांची हजारो कोटींची कर्जे बुडवल्याच्या आरोपांनंतर ते अल्बेनिया पासपोर्ट वापरून देशाबाहेर पळाले होते. सध्या ते फरार आहेत आणि त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

९,७७८ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त
तपास यंत्रणांनुसार, संदेसरा समूहाच्या परदेशी कंपन्यांनी भारतीय बँकांच्या परदेशी शाखांकडून मोठ्या प्रमाणात कर्जे उभी केली होती. आंध्रा बँक, बँक ऑफ इंडिया, SBI, यूको बँक, इलाहाबाद बँक आदींच्या कंसोर्टियमने ही कर्जे दिली होती. ही कर्जे नंतर अनधिकृत मार्गांनी वळवली गेली, हे पैसे नायजेरियातील तेल व्यवसाय तसेच वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा ठपका आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत संदेसरा समूहाच्या ९,७७८ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.