लोकसभा, विधानसभा निवडणुकीकरिता नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या निवडणुकीकरिता निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली आहे. मतदान केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक यांना एका दिवसाकरिता साडेतीनशे रुपये इतके मानधन होते.
त्यामध्ये वाढ करीत पाचशे रुपये इतके मानधन मिळणार आहे. एकदरंच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनात पदानुसार दीडशे रुपये ते दोन हजार इतकी वाढ करण्यात आली आहे.मतदान अधिकारी यांना पूर्वी एक दिवसाकरिता अडीचशे रुपये मानधन मिळत होते. ते आता चारशे रुपये प्रतिदिन असे मानधन मिळणार आहे. शिपाई यांना दोनशे रुपये असे मानधन होते. ते आता साडेचारशे रुपये प्रतिदिन असे मिळणार आहे. आयकर निरीक्षक यांना एकदाच बाराशे रुपये मानधन होते. ते आता तीन हजार एकदाच मिळणार आहे. सूक्ष्म नरीक्षक यांना एकत्रित एक हजार रुपये याऐवजी दोन हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.