Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू


कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका रस्ते अपघातात राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी यांच्यासह तिघांचा मृत्यू झालाय. वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी हे एका कौटुंबिक लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला. महांतेश बिलागी हे कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी हे त्यांचा भाऊ आणि आणखी एका व्यक्तीसह बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून कलबुर्गी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान जेवरगी तालुक्यातील गौनाली क्रॉसजवळ अचानक त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या अपघातात महांतेश बिलागी, त्यांचा भाऊ शंकर बिलागी आणि इराणा शिरसांगी यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिल्गी यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्व प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून महांतेश बिल्गी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.