कुणाल कामरा हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे किंवा सामाजिक माध्यमांवरील कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. कामराच्या एका टी-शर्ट पोस्टमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये कामराने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता, ज्यावर 'RSS' मधल्या R अक्षरावर एक कुत्र्याचा फोटो होता. या फोटोसह त्याने "Not Clicked at a comedy club" असं कॅप्शन दिलं होतं. ज्यामुळे वाद निर्माण झाला.
केशव उपाध्ये यांची जोरदार टीका
या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांची मतं मांडली आहेत.काहींच्या मते, कामराने अप्रत्यक्षपणे RSS चा अपमान केला आहे, तर काहींना वाटते की टी-शर्टवर असलेले अक्षर 'R' नसून 'P' आहे, त्यामुळे हे गैरसमज आहे. काही लोकांनी टी-शर्ट कुठे मिळेल याबाबत प्रश्न विचारले आणि लिंक मागणी सुरु झाली. मात्र, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले की, "अशा असंख्य कुत्री आणि गाढवांनी संघाचा कामावर मुतण्याचा प्रयत्न केला, पण समाजानेच त्यांचा पेकाटात लाथ घातली. त्यामुळे संघ वाढत राहिला आणि कुत्री, गाढव गायब झाले!"
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील असा इशारा दिला आहे. तर या आधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केल्याचे सांगत आता त्याने थेट संघावर टीका करण्याची हिंमत केल्या बद्दल भाजपने त्याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
कुणाल कामरा आधीही राहिला आहे वादात
कुणाल कामरा हा यापूर्वीही अनेक वादग्रस्त घटनांमध्ये सामील राहिला आहे. मार्च २०२५ मध्ये कामराचा यूट्यूब स्पेशल 'नया भारत' चर्चेत आला होता. या शोमध्ये त्यांनी एका लोकप्रिय हिंदी गाण्याचे शब्द बदलून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याने शिंदेंना "गद्दार" म्हणून संबोधलं होतं, कारण २०२२ मध्ये झालेल्या राजकीय गटबदलामुळे महाविकास आघाडी सरकार गडगडलं होतं.दरम्यान यानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या काही समर्थकांनी शो रेकॉर्डिंगच्या ठिकाणी तोडफोड केली आणि कामराला धमक्या दिल्या होत्या. काही सदस्यांना अटक झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.