Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...


पुण्यात आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत एक जण थेट पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटल्यानंतर माझा मित्रही आयपीएस असल्याचं सांगितलं. मित्राबाबत अधिक विचारताच जे नाव घेतलं तोच समोर आल्यानं बनावट आयपीएस अधिकाऱ्याचं पितळं उघडं पडलं. आता या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर वाघमोडे असं बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातला असलेला सागर वाघमोडे हा आपण आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत फिरत होता. तो पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा चौकशीत त्याचं पितळ उघडं पडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्तालयात तो का गेला? कुणाला भेटला? त्याचा काय उद्देश होता? यामागचा तपास केला जात आहे.

थेट पोलीस आयुक्तालयात जाऊन मी आयपीएस अधिकारी आहे असं सांगण्याचं धाडस करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यानं असं का केलं? याचा शोध घेतला जात आहे. पोलीस आयुक्तालयात कुणाला जायचं असेल तर त्यांची गेटवरच विचारपूस होते, काय काम आहे याची विचारणा करण्यात येते. पण याच आयुक्तालयात थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मी आयपीएस अधिकारी आहे अशी बतावणी करणारा तरुण पोहोचल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पोलीस आयुक्तालयात येऊन मी आयपीएस अधिकारी आहेत अशी भूलथापा मारून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो बाता मारत असताना बंडगार्डन पोलिसांनी वाघमोडेला ताब्यात घेतलं. शनिवारी सांयकाळच्या सुमारास एका वरिष्ठ पोलीस उपायुक्तांना भेटण्यासाठी आरोपी सागर वाघमोडे आला होता. त्यांना बोलत असताना एका आयपीएस अधिकारी माझ बॅचमेंट आहेत असं म्हणत एकाचं नाव सांगितलं. त्यावेळी खुद्द तेच आयपीएस अधिकारी समोर आल्यानंतर त्याचं पितळ उघड पडलं. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंड गार्डन पोलिसांना तात्काळ बोलून घेतेस अधिकारी सागर वाघमोडेला ताब्यात गुन्हा दाखल केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.