नाशिक :- महिला PSI सोबत घडलं भयंकर..! सावकाराकडून कर्ज घेतलं, परतफेड करण्यात उशीर झाला अन्.; चौघांवर गुन्हा दाखल
नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला सावकारीच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जाची वसुली करण्यासाठी तिला धमकावण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका महिला संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी, विक्की कुमावत, सोनाली, देवयानी आणि अनंता पवार या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक निशा वाकडे (रा, स्नेहबंधन पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी महिन्यात त्यांनी संशयित सावकारांकडून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज दरमहा 3.5 टक्के व्याजदराने देण्यात आले, जे महाराष्ट्र सावकारी अधिनियम 1946 नुसार अवैध आहे. कर्ज घेताना वाकडे यांनी आपला फ्लॅट गहाण ठेवला होता. कर्जाची परतफेड वेळेवर करू न शकल्याने संशयितांनी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. फ्लॅट विकून टाकण्याची आणि बेघर करण्याची धमकी दिल्याने वाकडे यांनी अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सोनाली या सावकारकी करणाऱ्या महिला संशयितेला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.