जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथे आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
गुलाबराव पाटील यांनी या तक्रारींचे समर्थन करत आणि राजकीय परिस्थितीवर मिश्किल टोलेबाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार किशोर पाटील यांचा राग योग्य आहे. भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले, पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केले नाही, हे मी मान्य करतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
किशोर पाटील यांचा राग योग्य असून भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले, पण आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात काम केले नाही, हे मी मान्य करतो. माझ्यावर पण एकदा अन्याय झाला होता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला होता. पाच वर्ष मेहनत करून ऐनवेळी कुणी गोंधळ घालत असेल, तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो. किशोर पाटलांच्या सांगण्यात एक तडतड आणि कळकळ आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
स्थानिक परिस्थितीवर पण काही निर्णय होतील
यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या आमदार किशोर पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आज ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात येत आहेत. त्यांना दुसरा पर्याय नाही. दुसऱ्या पक्षात जाऊन काय मिळणार? मेरे जिस्म पर बाळासाहेब ठाकरे का नाम है. मै आज जो हू बाळासाहेब की वजह से हू… अशा शेरो शायरीद्वारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
किशोर पाटील पोलीस असताना शिवसैनिकांनाच मारायचे आणि आता शिवसेनेमुळेच आमदार झालेत. मी देखील टपरीवाला आता मंत्री झालो पोलीस मागे पुढे असतात बरं वाटतं. शिवसैनिक माझ्याही अंगात आहे. परंतु मंत्री म्हणून जबाबदारीने वागावे लागेल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर थेट भाष्य करणे टाळले. परंतु पाचोरा-भडगाव मधील परिस्थिती पक्ष नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचवेन. मला खात्री आहे की ते काही तोडगा काढतील. परंतु या ठिकाणी आता तोडगा काढण्याच्या पलीकडे स्थिती झाली आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसैनिक माझ्याही अंगात आहे
किशोर पाटलांच्या विरोधात कितीही लोक एकत्र आले तरी, त्यांनी कामे केली आहेत. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात त्यांना घवघवीत यश मिळेल, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. मेरे जिस्म पर बाळासाहेब ठाकरे का नाम है. मै आज जो हू बाळासाहेब की वजह से हू.. अशा शायरीद्वारे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक माझ्याही अंगात आहे, परंतु मंत्री म्हणून जबाबदारीने वागावे लागेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी महिलांना अर्धे तिकीट, एक रुपयात विमा, शासन आपल्या दारी, रात्री तीन वाजेपर्यंत काम करण्याची धडाडी आणि मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय अशा योजनांचा उल्लेख केला. अडीच वर्षात सतरा वेळेस येणारे एकमेव एकनाथ शिंदे आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.