केंद्र सरकारची महत्वाकांक्षी 'प्रधानमंत्री सूर्य घर योजना' देशभरात वेगाने राबवली जात आहे. नागरिकांना वीजबिलाच्या ताणातून मुक्त करणारी ही योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. या योजनेअंतर्गत घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवून दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज आणि मोठी सरकारी सबसिडी दिली जाते. सरकारने या योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
काय आहे योजना ?
'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना' ही रुफटॉप सोलर प्रकल्पासाठीची सरकारी योजना आहे. याचा उद्देश नागरिकांना स्वतःची वीज निर्मिती करण्यास सक्षम बनवणे, वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी करणे, 24 तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे आणि देशातील कार्बन उत्सर्जन घटवणे आहे. ज्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची जागा आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
रजिस्ट्रेशन कसे करायचे?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmsuryaghar.gov.inApply Now वर क्लिक करामोबाइल नंबर व कॅप्चा भरून OTPद्वारे लॉगिन करानाव, पत्ता, राज्य, जिल्हा, ईमेल इ. माहिती भरा'Apply for Solar Rooftop' निवडाराज्य, जिल्हा व DISCOM निवडा आणि ग्राहक क्रमांक भरून फॉर्म सबमिट करा
काय-काय कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
उत्पन प्रमाणपत्र
वीजबिल
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
बँक पासबूक
अर्जानंतरची प्रक्रिया काय?
DISCOM तुमची माहिती तपासेलमाहिती योग्य आढळल्यास अप्रूवल दिले जाईलत्यानंतर पोर्टलवरून वेंडर निवडावावेंडर घराची पाहणी करून किती kW चा प्लांट बसवायचा ते निश्चित करेलसोलर पॅनल इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर DISCOM नेट मीटर बसवेलग्रिड कनेक्शन व तपासणी झाल्यावर फायनल अप्रूवल दिले जाईलसबसिडी थेट बँक खात्यात जमा होईलत्यानंतर दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळू लागेल
सोलर सिस्टीमवर किती सबसिडी मिळेल?
केंद्र सरकारकडून सबसिडी:
1 kW : ₹30,000
2 kW : ₹60,000
3 kW व त्यापुढे : ₹78,000
याशिवाय राज्य सरकारकडूनही स्वतंत्रपणे सबसिडी मिळत असल्याने एकूण लाभ आणखी वाढतो. त्यामुळे सबसिडीची रक्कम प्रत्येक राज्यात वेगळी असू शकते.
ही योजना विशेष का?
वीजबिलात मोठी बचतसतत उपलब्ध पर्यावरणपूरक वीजदेशातील कार्बन फुटप्रिंट घटविण्यास मोठी मदतघरगुती खर्चात वर्षाला हजारो रुपयांची बचत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.