फडणवीसांच्या नागपुरात भाजप उमेदवाराच्या फार्महाऊसवर धाड, बोगस व्होटर मतदार ओळखपत्रे आणि शाई मिटविण्याचे केमिकल जप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्येच भाजप उमेदवाराकडून बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कामठीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्या फार्महाऊसवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी धाड टाकून बोगस मतदार ओळखपत्र आणि शाई मिटवण्याचे केमिकल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कामठी रोडवर आशा हॉस्पिटलच्या जवळील फार्महाऊसवर भाजपच्या उमेदवाराकडून बोगस मतदान करून घेतले जात असल्याची तक्रार माजी मंत्री अॅड. सुलेखा पुंभारे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाच्या पथकाने सुनील अग्रवाल यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर छापा टाकला. या कारवाईत पथकाला मोठय़ा प्रमाणावर बनावट व्होटर आयडी कार्ड्स आणि बोटाला लावलेली शाई पुसण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद द्रव्य मिळून आले आहे.
'लाला ओळी' मतदान केंद्रावर 12 जणांना पकडले
फार्महाऊसवर कारवाई सुरू असतानाच कामठीतील 'लाला ओळी' परिसरातील मतदान पेंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱया 12 तरुणांना सतर्क नागरिक आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे सर्व तरुण कन्हान येथील वाघधरे वाडी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांना प्रत्येकी 200 रुपये देऊन मतदान करण्यासाठी आणले होते, अशी कबुली त्यांनी पोलीस चौकशीत दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.