हसतं खेळतं कुटूंब उद्धवस्त! पतीने झापेतच पत्नीला संपवलं, 4 वर्षाच्या पोटच्या मुलावर कुऱ्हाडीने सपासप वार
बुलढाणा जिल्ह्यातून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली असून, मेहकर शहरात रविवारी उत्तररात्री रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला. कौटुंबिक वादाचे रुपांतर एका भीषण कृत्यात झालं असून, यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरला आहे.
डोक्यातील संशयाच्या भूतामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कुऱ्हाडीने सपासप वार
चारित्र्याच्या संशयावरून राहुल हरी म्हस्के या 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी अत्यंत क्रूर पाऊल उचलले. त्याने गाढ झोपेत असलेल्या आपली 30 वर्षांची पत्नी रूपाली आणि अवघ्या 4 वर्षांचा निरागस मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आवाजामुळे राहुलच्या आईला जाग आली आणि त्यांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
गंभीर जखमी झालेल्या रूपालीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चिमुकल्या रियांशचाही या हल्ल्यात जीव गेला. या प्रकरणी मृत रूपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
दरम्यान दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथून जवळच असलेल्या भानापूर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरुबा आव्हाळे (वय वर्ष 35) यांनी आर्थिक विवंचना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.