Breaking News! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुण्यातील प्रभाग 10 बावधनमधून जयश्री मारणे यांनी उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिले आहे.
मात्र काही दिवसांपूर्वी पुण्यातील गुन्हेगारी थांबवा असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते मात्र आता त्यांच्यात पक्षाने गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी तसेच महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता देखील व्यक्त केली होती मात्र त्यांच्याच पक्षाकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला आता उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटलांना देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एबी फॉर्मचे वाटप केले आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर याने देखील पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या तो आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असून त्याने प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष अर्ज भरला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांनी देखील पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये युतीची घोषणा झाली असून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट देखील एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन मतभेद निर्माण झाल्याने शिवसेना शिंदे गटाने पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष नाना भांनगिरे यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.