सांगली: एका बाजूला उमेदवारीसाठी चढाओढ चालली असताना, दुसऱ्या बाजूला प्रभाग 9 मधून आपणच उमेदवारी घ्यावी, यासाठी यांच्याकडे सर्वपक्षीय ते आग्रह होत आहे. आपल्या सामाजिक कामातून कष्टकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत साऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या सुनीता काळे या प्रभागाची पहिली पसंती असून सारा प्रभाग त्यांच्यामागे ठाम उभा असल्याची मत नागरिकांनी केली आहे.
बैठकीत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रभाग 9 मधून स्वतः सुनीता काळे या अग्रेसर असून यावेळी त्यांनाच निवडून दयायचा असा चंग बांधला आहे. यावेळी त्यांनी प्रभागातील प्रताप चौक येथील गणपती मंदिरात कार्यकर्त्यांना घेऊन मंदिरात श्रीफळ वाढविले व प्रचाराला सुरवात केली. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप, बेघर गरिबांना वेळोवेळी अन्नदान, आरोग्य शिबिरे, शुध्द जल, शीतपेय युनिट, सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम केले होते. यावेळी सुनिता काळे,इंदुमती शरद वाडे,बीबी मुळीक,सुरेखा चौगुले, सारिका वगरे, सुजता सोलापूरे वैशाली चव्हाण सुरवंशी मॅडम, रूपाली चव्हाण शोभा शिंदे,रुक्मिणी वगरे,उमा सावंत आदी महिला उपस्थित होत्या
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.