Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रभाग १० मध्ये मासाळेसाठी सर्वपक्षीय आग्रह सौ. रेखा व अशोक मासाळे यांना बळ द्या : रवींद्र ऐवळे

प्रभाग १० मध्ये मासाळेसाठी सर्वपक्षीय आग्रह सौ. रेखा व अशोक मासाळे यांना बळ द्या : रवींद्र ऐवळे


सांगली: एका बाजूला उमेदवारीसाठी चढाओढ चालली असताना, दुसऱ्या बाजूला प्रभाग १० मधून आपणच उमेदवारी घ्यावी, यासाठी सौ. रेखा आणि अशोक चंद्राप्पा मासाळे यांच्याकडे सर्वपक्षीय ते आग्रह होत आहे. आपल्या सामाजिक कामातून कष्टकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत साऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या मासाळे दांपत्यालाच या प्रभागाची पहिली पसंती असून सारा प्रभाग त्यांच्यामागे ठाम उभा असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ऐवळे व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

बैठकीत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रभाग १० मधून स्वतः असोक चंद्राप्पा मासाळे व सौ. रेखा अशोक मासाळे इच्छुक आहेत. अशोक मासाळे अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. २०१८ च्या निवडणुकीत या प्रभागाने त्यांना १२०० मतांचे सहकार्य केले होते. प्रभागाविषयी प्रेम व कळकळ असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आण्णा लोकसेवा फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात अनेक लोकोपयोगी कामे केली असल्याचे सांगण्यात आले. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप, बेघर गरिबांना वेळोवेळी अन्नदान, आरोग्य शिबिरे, शुध्द जल, शीतपेय युनिट, सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध

सांस्कृतिक उपक्रम, प्रभाग क्र. १० मधील मनपा शाळा क्र. २२ या शाळेस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी तसेच त्यांचा कर्मवीर चौकातील पुतळा उभारण्यासाठी मोलाचे योगदान, तसेच सांगली बुध्दविहारसाठी सहकार्य केले. पूरग्रस्तांना मदत, युवकांना अर्थसाहाय्य व रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली

काळी खण सुशोभीकरण, रेल्वे स्टेशन ते कॉलेज कॉर्नर रस्ता, मीरा हौ. सोसा. ते मेहता हॉस्पिटल रस्ता, आमराईमधील सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा केल्याचे कार्यकत्यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याची दखल सर्वच राजकीय पक्षांनी घेतली असून त्यांना उमेदवारी देण्यासाठी सर्वपक्षीय आग्रह होत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.