Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांकडून इच्छुकांच्या एकत्रित मुलाखती

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांकडून इच्छुकांच्या एकत्रित मुलाखती


सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. आमराई क्लब येथे खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी दोन्ही काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

सांगली महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकसंघपणे लढविणार असून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, बहुजन वंचित आघाडी, शिवसेना ठाकरे या पक्षांचा समावेश आहे. दोन्ही राष्ट्रवादी वगळता अन्य पक्षांनी आपल्या इच्छुकांच्या नावाची यादी तयार केली आहे.
महापालिका निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढवू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांनी आपली नावे यापुर्वीच त्या त्या पक्षाच्या शहर अध्यक्षांकडे नोंदवली आहेत. आज या इच्छुकांच्या संयुक्तपणे मुलाखती आमराई क्ललमध्ये घेण्यात आल्या. सकाळी दहा वाजलेपासून सायंकाळ पर्यंत इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. यावेळी इच्छुकांच्या समर्थकांनीही मोठी गर्दी केली होती. मुलाखतीसाठी केवळ एक अथवा दोघांनाच मुलाखत कक्षामध्ये प्रवेश देण्याात येत होता.

यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. कदम व खासदार पाटील यांनी इच्छुकांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राहूल पवार, शेखर माने, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. इच्छुकांना तुमचे प्रभागात कोणते सामाजिक कार्य आहे, तुम्हालाच उमेदवारी का मिळावी असे जुजबी प्रश्‍न विचारण्यात आले.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होउन दोन दिवस झाले असून निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सहा अस्थायी कार्यालयातून गेल्या दोन दिवसात १ हजार १४६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज नाताळ सणाची सुट्टी असल्याने निवडणूक कार्यालय बंद होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.