सोमनाथ मांगूरकर ….अष्टपैलू व्यक्तिमत्व .
सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! आज तुमच्या वाढदिवसानिमित्त थोडस लिहावस वाटल म्हणून हा थोडासा प्रयत्न,आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात पण ते होण्यामागे जो काही त्याग आणि जे काही कष्ट घेतलात त्याची कहाणी बऱ्याच कमी लोकाना माहीत आहे.
अर्जुनवाड मधील एकमेव घर असलेल्या ब्राह्मण समाजात तुमचा जन्म झाला आणि तेही सामान्य कुटुंबात,घरची परिस्थिती हालाकीची वडील पौरोहित्याची म्हणजेच भटजी काम करायचे तर आई अंगणवाडी शिक्षिका. खेडेगाव असल्यामुळे भटजी महाराजांना रोजचे काम नसायचे आणि जे काही तुटपुंजी कमाई व्हायची त्यावरच घरची रोजीरोटी चालायची आणि त्यावेळी आईनाही पगार कमी असल्यामुळे कसेतर घर चालायचे,हौस म्हणून काही करायचं झाल तर त्याला खूप मर्यादा यायच्या,अनेक स्वप्नाना आणि अपेक्षाना बांध घालून तुम्ही जगत होता आणि रोजचा दिवस ढकलत होता पण सोमनाथ नावाच वादळ त्या घरात घोंगावत होत अगदी लहानपणापासूनच चेष्टा मस्तीखोर आणि स्पष्ट बोलण्याचं व्यसन तुम्हाला होत चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याच धाडस तुमच्यात होत मग समोरचा कुणीही असो त्याला काय वाटेल याची पर्वा कधी केली नाही,दिवसामागून दिवस जात होते तुम्ही दहावी उत्तीर्ण झालात मग गावातील ऊस तोडणीचे काम केलात वाळू ठेकेदारांची जेवण पोहोच केलात भटजी कामही केलात पण कशातच यश येत न्हवते कारण त्या कामात तुमचे मनच लागत न्हवते मग तुम्ही गावच्या सोसायटीत एंट्री केलात तिथे झालेली वाताहत तर संपूर्ण गावाने पाहिली मग गावातील एका दुध डेयरीत कामाला लागलात घरात थोडे पैसे येऊ लागले थोडी चणचण कमी झाली पण काहीतरी मोठ करायचं ही जिद्द तुम्हाला स्वस्थ बसू देत न्हवती त्यासाठी अखंड धडपड चालूच होती मग तुम्ही शिरोळ च्या मयूर दूध संघात कामाला लागलात विनोदी व बोलका स्वभाव असल्यामुळे चेअरमन साहेबांच्या खूप जवळ गेलात,त्यांचे खूप विश्वासू म्हणून ओळख झाली.स्वतःच्या कौशल्याने दूध संकलनात खूप वाढ केलीत तालुक्यात अनेक दूध संस्था उभारल्या आणि मयूर संघात सोमनाथ मांगुरकर हे नाव गाजू लागल एक मोठ वलय निर्माण केलत तरीदेखील अजून काहीतरी मर्यादा येत होत्या,स्वप्नांना कुठे तरी ब्रेक लागत होता आणि म्हणून तुम्ही सरळ मुलाबाळासह पुण्याला जाऊन भूषण येळकर यांच्या डेअरीत जॉबला सुरुवात केली,दूध व्यवसायातील प्रचंड अनुभव पाठीशी होताच त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेत न राहता स्वतःच्या कौशल्य गुणाचा योग्य वापर करून फक्त दुधापुरते मर्यादित न राहता दूध पावडर,बटर,तूप यांचे मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करून भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलात…पण इथपर्यंत पोहोचणं सोप न्हवत त्याच्यामागे त्याग होता,धडपड होती,स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या पत्नीची निस्वार्थी साथ होती.यशस्वी पुरश्याच्या मागे एक स्त्री असते हे म्हटले तरी वावगे ठरणार नाही….कारण लक्ष्मीच्या पावलानी पत्नीने तुमच्या आयुष्यात जसे आगमन केले तेव्हापासूनच आयुष्याला दिशा मिळाली,ध्येय मिळालं.जगण्याचा खरा अर्थ समजला आणि त्या दृष्टीने यशाचा मार्ग खुणावत गेला त्यामुळे तुम्ही बाहेर असताना तुमच्या पत्नीने संसाराचा गाडा अगदी धैर्याने सांभाळला आणि म्हणूनच या सगळ्या यशात त्यांचं स्थान खुपच मोठ आहे हे कोणीही नाकारू शकणार आहे .
कारण कामनिमित्त कुठेही बाहेर जावे लागत असल्यामुळे कुटुंबाला पूर्ण वेळ देता येत न्हवता अगदी दिवाळीची कित्येक अभ्यंग स्नान हॉटेल मध्येच झालेली मग फक्त फोनवर घरच्यांशी बोलून स्वतःचे अश्रू रोखून त्यांचे सांत्वन केलात कारण मुलाबाळान्ना सोडून दिवाळीचा सण साजरा करणे एका बापला किती जड जाते याची कल्पना न केलेलीच बरी,पण भविष्याच्या अनेक सुखासाठी तेव्हा हा त्याग करणे महत्वाचे होते,,पत्नी व दोन मुलांसाठी तेव्हा केलेला त्याग आज त्यांच्या सुखी आयुष्याचा आरसा आहे.
आयुष्याच्या वेलीवर खुललेली दोन गोंडस फुले म्हणजे ऐश्वर्या आणि स्वानंद,,,परिपूर्ण कुटुंबाचा रकाना कधी भरला हे समजलच नाही,आयुष्यात केलेल्या सत्कर्माची पोहोचपावती म्हणजेच ऐश्वर्याला मिळालेल सासर पंढरपूर.कधीतरी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन व्हाव अशी सर्वांचीच इच्छा असते आणि तुमची मुलगी तर रोज विठुरायांची सेवा करणाऱ्या बडव्यांच्या घरी गेली किती ते परमभाग्य! अघ्यात्मिक सासू सासरे व निर्व्यसनी पती ऐश्वर्याला मिळाले याच निरंतर समाधान तुमच्या चेहऱ्यावर असते..तसेच स्वानंदचा देखील महागातला महाग हट्ट तुम्ही पुरवलात एक मुलगा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून त्याच्याशी जे वागता ते बऱ्याच पालकांसाठी झणझणीत अंजन आहे,तुम्ही सदैव बोलता “माझ्या वाट्याला जे कष्ट स्ट्रगल आल आहे ते माझ्या मुलाना नको ती माझी काळजाची तुकडे आहेत,माझी मुलच माझी दुनिया आहे आणि तीच माझी ऑक्सीजन आहेत” एका भावनिक आणि संवेदशील बापाच दर्शन यातून घडल.खरच तुमची मुल तुमच्यासाठी रत्न आहेत तुमचा श्वास आहेत …..
सगळ काही सुरळीत चालू असताना अचानक कोरीनाच्या काळात आईंच छत्र हरवलं तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आघात होता कारण तुमची मानसिक ताकद तुम्ही हरवलात होता, आईच्या मायेला पोरका झाला होतात त्यानंतरही आयुष्यात बरेच चढ उतार आले अनेक संकटे आली,जवळचे नातेवाईक दूर गेले काहीनी मध्येच साथ सोडली,काहीनी तर फक्त वापर करून घेतला पण कशालाही न डगमगता धैर्याने सगळ्यांचा मुकाबला केलात,आणि याचे प्रमुख कारण आहे तुम्ही जोडलेली माणसं व जपलेली मैत्री! राजकीय व्यक्ती असो की शाशकीय अधिकारी, मोठा व्यावसायिक असो की परदेशातील बिजनेसमैन सर्वाशी तुमच्या स्वभावाने घट्ट माळेत घुंफला आहात…. आणि तुमच्या स्वकर्तुत्वाने व आई वडिलांच्या आशीर्वादाने परमेश्वराने आज तुम्हाला भरभरून दिले आहे स्वतःचे घर,फ्लॅट,फार्महाऊस,शेती,आलिशान गाड्या,चीन,जपान,थायलंड अश्या अनेक फॉरेन ट्रिप्स आणि दरवर्षाला ऑल वर्ल्ड मिल्क डेअरी एक्झिबिशनला दुबईवारी होत असते…निरोगी आयुष्याला महत्व देण्याची तुमची सवय खूप प्रेरणादायी आहे कारण गेली १२ ते १५ वर्षे तुम्ही दररोज १० किलोमीटर चालून १ तास कृष्णा नदीत मनसोक्त पोहून युवा पिढीसाठी एक आदर्श ठेवलात याचे समाधान नक्कीच असेल या सगळ्या सुखाचा आनंद घेत असताना कधी तरी शांत डोळे मिटून भूतकाळाची धडपड आठवली तर नक्कीच डोळे पाणवतील आणि केलेल्या कष्टाची आणि त्यागाची उतराई झाली असेच वाटेल, तुमच्या सुखी व निरोगी आयुष्यासाठी खूप खूप प्रार्थना आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा !
शब्दांकन विनोद पाटील अर्जुनवाड
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.