सांगली महापालिका सर्वपक्षीय उमेदवार यादी पहा
सांगली दिं.३०(प्रतिनिधी) सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्ष स्वतंत्रपणे मनसे आणि राष्ट्र विकास सेनेसोबत ३५ जागावर निवडणूक लढवत आहे. तर महायुतीमध्येही फूट पडली असून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गट एकत्रीतपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.भाजपा सर्वच्या सर्व म्हणजे ७८ जागा स्वतंत्रपणे लढवत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला वेगळाच रंग भरणार आहे. अपक्षांची संख्या ही मोठी असणार आहे.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या एकूण ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चारही केंद्रावर उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी ,भाजपा ,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या सर्वच पक्षाने आपल्या उमेदवारांना आज एबी फॉर्म दिल्याने पक्षातर्फे तसेच अपक्षांची ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे निवडणूक लढवत आहेत तर महायुती मधील भाजपा , राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक संघपणे निवडणुकीला सामोरे जात असले तरी काँग्रेसने ३४ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गटा)ने २९ उमेदवारांची यादी प्रसिद्धीस दिली आहे. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला योग्य न्याय न दिल्याने शिवसेनेने मनसेला सोबत घेऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा समन्वयक माजी खासदार संजय पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी सायंकाळी पत्रकार बैठक घेऊन आम्ही महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगितले. आम्ही एकूण ३३ जागा लढवत आहोत जिथे विजय निश्चित होईल अशा जागी आम्ही उमेदवार दिले आहेत सांगली महापालिकेत आमच्या शिवाय सत्ते पर्यंत कोणताच पक्ष पोहोचू शकणार नाही. त्यामुळे आम्हीच महापालिकेतले किंग मेकर असो असा दावाही माजी खासदार पाटील यांनी यावेळी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार यादी
प्रभाग क्रमांक २ (ब) कासम मुल्ला,
प्रभाग क्रमांक ३(अ) अर्चना पॉल चोको,
प्रभाग क्रमांक ३(क) सुग्रावी मुजावर,
प्रभाग क्रमांक ३ (ड) विकास मगदूम (मनसे), प्रभाग क्रमांक ४ (क) सुमित कांबळे ,
प्रभाग क्रमांक ४ (ड) सुरेश शेळके,
प्रभाग क्रमांक ५ (ब) जैदाबी बारगीर,
प्रभाग क्रमांक ५ (क) इक्रा निशानदार,
प्रभाग क्रमांक ५ (ड) असलम सौदागर,
प्रभाग क्रमांक ६ (ब) नुरजान जमादार,
प्रभाग क्रमांक ६ (ड) बासीदाली पठाण,
प्रभाग क्रमांक ७ (अ) सोनाली कांबळे ,
प्रभाग क्रमांक ७ (ब) महादेव हुलवान ,
प्रभाग क्रमांक ७(क) दीक्षा गायकवाड ,
प्रभाग क्रमांक ७ (ड) विठ्ठल शिंगाडे (मनसे),
प्रभाग क्रमांक ८(अ) अभिजीत कणिरे ,
प्रभाग क्रमांक ८(क) स्टेफ कनेरे,
प्रभाग क्रमांक ८(ड) अनिल माने,
प्रभाग क्रमांक ९ (अ) हरिदास पडळकर,
प्रभाग क्रमांक ९ (ड) ओमकार देशपांडे,
प्रभाग क्रमांक १० (ब) अनिल शेटे,
प्रभाग क्रमांक १० (ड) लक्ष्मण वडार,
प्रभाग क्रमांक १२ (अ) पूनम मयूर घोडके,
प्रभाग क्रमांक १२(क) मयूर बजरंग घोडके,
प्रभाग क्रमांक १२ (ड) रोहित घुबडे पाटील,(मनसे),
प्रभाग क्रमांक १५ (क) मंगल माळगे,
प्रभाग क्रमांक १६ (अ) उमर गवंडी,
प्रभाग क्रमांक १६ (क) वैष्णवी मोरे,
प्रभाग क्रमांक १६ (ड) गणेश तिवडे,
प्रभाग क्रमांक १७ (ड), परशुराम जामगाई,
प्रभाग क्रमांक १९ (अ) स्टेला गायकवाड,
प्रभाग क्रमांक १९ (ब) प्रकाश मदने,
प्रभाग क्रमांक १९ (ड) राजू गायकवाड,
प्रभाग क्रमांक २०(अ) दिया कांबळे,
प्रभाग क्रमांक २० (क) सचिन कोरे,
या सर्व उमेदवारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले आहेत, असे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी माजी नगरसेवक व पदाधिकारी विविध पक्षाच्या वतीने मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाने ५३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. मिरज, सांगली आणि कुपवाड या तिन्ही शहरातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केला असला तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मोठी नाराजी दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या ही मोठी आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीत बिघाडी..
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्वतंत्रपणे लढणार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.