Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : माजी महापौर देवमाने यांची जनसुराज्यमध्ये घरवापसी

सांगली : माजी महापौर देवमाने यांची जनसुराज्यमध्ये घरवापसी


सांगली : महापालिका निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिरजेत धक्का देत असताना सांगलीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपला धक्का दिला. महायुती अथवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे अद्याप निश्‍चित झालेली नसली तरी संभाव्य उमेदवार पळवापळवीला जोर आला आहे.

माजी उपमहापौर देवमाने यांनी गेल्याच आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मेळाव्यात जनसुराज्य पक्षातून बाहेर पडून प्रवेश केला होता. एकीकडे राष्ट्रवादीकडे दिग्गज कार्यकत्यार्ंचा ओढा होता. दोन माजी महापौरासह १५ माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला होता. यामुळे महायुतीची राजकीय गणिते जटिल बनत चालली होती. अशातच पुन्हा जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष कदम यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची घरवापसी घडवून आणली आहे.

आज देवमाने यांचे पुन्हा जनसुराज्यमध्ये स्वागत करत असताना माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रभागातील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे घरवापसीचा निर्णय घेतला असल्याचे श्री. देवमाने यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही चार माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घडवून आणला. यामध्ये स्नेहल सावंत, अभिजित भोसले, रज्जाक शेख, सचिन सावंत यांचा समावेश आहे. भाजपकडील आणखी एक माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य व रिपाइं यांच्यातील जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात पोहचली असून येत्या दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली. महायुतीतील शिवसेना शिंदे गटातील उमेदवाराबाबत भाजपच्या एका नेत्यांने आक्षेप घेतला असून यामुळे उमेदवार निश्‍चित करण्यात अडथळा आला आहे. आज-उद्या यावर निर्णय अपेक्षित असून यानंतरच महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.