Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावकराचा अमानुष चेहरा पाहून महाराष्ट्र हादरला, कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

सावकराचा अमानुष चेहरा पाहून महाराष्ट्र हादरला, कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली


हतबल बळीराजाला जणू अस्मानी, सुलतानी अन सावकारी संकटाच ग्रहण लागलं आहे. या प्रत्येकाकडूनच बळीराजाच्या पदरी निराशा अन मन हेलावणार दुःख सहन करावं लागत आहे. सावकारी जाचाचा भयंकर अन संतापजनक प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे.

नागभीड तालुक्यामधील मिंथुर गावातील घटना तुमचंही काळीज चिरल्याशिवाय राहणार नाही. सावकारी कर्जाचा जाळ्यात अडकलेल्या रोशन सदाशिव कुडे या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादाई प्रसंग ओढवला. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहेत. निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला पुरता हरलाय. रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो. निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. 

दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50-50 हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात. त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत . कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. मात्र कर्ज काही संपेना.

एक लाखाचे कर्ज 74 लाखावर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली. या संतापजनक प्रकाराने आता महाराष्ट्र हादरला असून विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. पण आता या बळीराजाला न्याय कसा मिळेल आणि कधी मिळेल हा एक प्रश्नच राहील. शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केलं ते केलं बोलणारं सरकार आता या घटनेत काय पाऊल उचलेल हे येणाऱ्या दिवसात पाहणं महत्त्वाचं असेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.