उमदीच्या तरुणाचा जतमध्ये खूनप्रकरणी दोघांना अटक दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून घटना : सांगली एलसीबीची कारवाई
उमदीच्या तरुणाचा जतमधील जनावर बाजार परिसरात खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दारूचे बिल देण्यावरून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली. रविन्द्र आबासाहेब बंडगर (वय ३०), विराज संजय पांढरे (वय २०, दोघेही रा. शिवाजी पेठ, जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास मलकारी टकले (वय २२, रा. टकलेवस्ती, उमदी, ता. जत) असे मृत तरुणाचे नाव आहे. दि. 18 डिसेंबर रोजी विकास टकले याचा जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जनावर बाजार परिसरात खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आले होते. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली.
या परिसरातील सिसिटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयितांची ओळख पटली. त्यांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, रविद्र बंडगर व त्याचा मित्र विराज पांढरे हे जत मार्केट यार्ड येथे शेकोटीजवळ बसले होते. तेथे मृत विकास शेकोटीजवळ येवून बसला होता. रविद्र बंडगर व विराज पांढरे यांचेसोबत मयत इसम चिकास टकले याचेत ओळख झाली. रविद्र बंडगर व विराज पांढरे यांना मयत इसमाने दारु पिण्याकरीता पैसे देतो असे सांगुन दारु घेण्याकरीता दुकानाजवळ घेवून गेला. तेथे गेल्यानंतर विकास टकले याने त्याचेकडे पैसे नसल्याचे सांगितले. रविंद्र बंडगर व विराज पांढरे यांना विकास टकले याचेकडे पैसे नसताना दारू देतो असे खोटे बोलून शेकोटीजवळून उठवून घेवून गेला याचा राग आल्याने त्यास धडा शिकवूया असे रविद्र बंडगर व विराज पांढरे यांनी ठरवून विकास टकले यास मोटार सायकलवरुन जत येथील जनावर बाजार आवारात घेवून जावून लाकडी बैंटन पट्टीने मारहाण करीत असताना त्याने रविद्र बंडगर व विराज पांढरे यांना आईवरून अश्लिल शिवीगाळी करू लागल्याने रविद्र बंडगर व पांढरे यांनी चिडुन मयत विकास टकले याचे अंगावरील कपडे काढुन टाकून डोक्यात दगड घालून खुन केला असल्याचे सांगितले. दोघांना अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, अमर नरळे, सागर लवटे, अमिरशा फकीर, सागर टिंगरे, संदिप गुरव, सतिश माने, मच्छिन्द्र बर्डे, आमसिध्द खोत, उदय माळी, केरबा चव्हाण, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्यातील अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.