बँकेत सरकारी नोकरी करावी, असं अनेकांचे स्वप्न असते. बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसंदर्भात नोटिफिकेशन जारी केले आहे. बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी bankofindia.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. बँक ऑफ इंडिया क्रेडिट मॅनेजरची ही भरती GBO स्ट्रीमसाठी आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची नियुक्ती मॅनेजमेंट ग्रेड स्केल I, मिडल मैनेजमेंट ग्रेड स्केल-III आणि सीनियर मैनेजमेंट ग्रेड स्केल-IV साठी होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
बँक ऑफ बडोदामध्ये एकूण ५४० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी २५ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) स्केल पोस्टसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत त्यांच्याकडे ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) साठी ग्रॅज्युएशनसह ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. क्रेडिट ऑफिसर SMG-IV साठी ग्रॅज्युएशन आणि ८ वर्षांचा अनुभव असावा.
अर्ज कसा करावा?
यानंतर न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. यानंतर ईमेल, मोबाईल नंबर ही माहिती भरायची आहे.यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचे आहे. यानंतर तिथे संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.यानंतर संपूर्ण फॉर्म भरा. फोटो आणि सही अपलोड करा. यानंतर फी भरुन फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.