सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगलीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांना नुकतेच दिल्ली स्थित नीती आयोग मान्यता प्राप्त सॉक्रेटिस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्यावतीने 'मानद डॉक्टरेट' पदवी सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आली. त्या प्रित्यर्थ कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली च्या संचालक मंडळाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा सत्कार संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी व्हाईस चेअरमन अॅड.एस.पी. मगदुम म्हणाले कि, आमचे सहकारी श्री. रावसाहेब पाटील आता डॉ. रावसाहेब पाटील झाल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. त्याचा इथंपर्यंतचा प्रवास प्रेरणादाई आहे. त्यांनी आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये चौफेर कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अखंड सेवावृत्तीबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट देवून गौरव केलेला आहे. तर डॉ. रमेश ढबू म्हणाले कि, अगदी एका लहान खेड्यातून त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. पण त्यांच्यातील अथक परिश्रम करण्याची वृत्ती चिकाटी, दुरदृष्टी आणि नवनविन संकल्पनाना प्रत्यक्षात आणण्याची हातोटी यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.आव्हाने पेलण्याची आणि संघर्ष सहन करण्याची तयारी तसेच जिद्द आणि शिस्तप्रियता, सकारात्मक विचाराची जोपासणा यामुळे त्यांना इथंपर्यतचे यश संपादन करता आले. सर्व संचालक मंडळ तसेच सेवकांनी त्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले. यावेळी संचालक डॉ. अशोक आण्णा सकळे, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री. ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह अधिकारी व सेवक उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री. संजय सासणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.