Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चेनं धक्का बसला, सांगलीच्या माजी नगरसेविकेने रक्ताने पत्र लिहलं, म्हणाली....

सांगली :- भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चेनं धक्का बसला, सांगलीच्या माजी नगरसेविकेने रक्ताने पत्र लिहलं, म्हणाली....


सांगली: सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपकडून  उमेदवारी डावलल्याचे संकेत मिळाल्याने माजी नगरसेविका उषा अशोक पवार यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रक्ताने पत्र लिहित याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्या तक्रार करणार आहेत. उषा पवार या सांगली महापालिकेत अनेक वेळा नगरसेविका आणि दोन वेळा सभापती म्हणून काम करत होत्या. प्रभाग 19 मध्ये त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने विकासकामे राबवली आहेत. 'प्रभागात उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळे मी हा कठोर निर्णय घेतला आहे. भाजपच्या सर्व्हेत मी आघाडीवर होते, जनतेत माझा स्वीकार जास्त होता. तरीही माझा विचार झाला नाही. पक्षातील अन्याय दूर व्हावा यासाठी मी लाडक्या बहिणीच्या न्यायासाठी स्वतःच्या रक्ताने पत्र मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना देणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पक्षाचे वरिष्ठ नक्कीच विचार करतील आणि लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असे उषा पवार यांनी म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.