Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय रक्त, लघवीच्या चाचण्या 2 डॉक्टर, लॅबचालकांसह १७ जणांना नोटीस

तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय रक्त, लघवीच्या चाचण्या 2 डॉक्टर, लॅबचालकांसह १७ जणांना नोटीस


कराड : कराडमधील भेदा चौकातील लॅबोरेटरीत रक्त, लघवीच्या तपासणी डॉक्टरांशिवाय होत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह कराडमधील एकूण १७ जणांवर गुन्हा नोंदविला. दोन डॉक्टरांसह लॅबरोटरी चालवणाऱ्यांना कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. डॉ. सुशील शहा व डॉ.. स्मिता सुडके (दोघे रा. पुणे) अमिरा सुशील शहा व विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलिंद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव व कमलेश कुलकर्णी (सर्व रा. नवी मुंबई), विनायक दंताल (रा. कोल्हापूर), योगिनी व्यास, सतीश जाधव, विद्याधर भागवत, प्रवीण कांबळे, सचिन मोरे, सुषमा चव्हाण, अनिलकुमार जाधव (सर्व रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.