Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावरी ड्रग्ज फॅक्टरीचं थेट 'पुणे कनेक्शन'! अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्याला बेड्या; मुळुंड ते सावरी व्हाया पुणे

सावरी ड्रग्ज फॅक्टरीचं थेट 'पुणे कनेक्शन'! अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्याला बेड्या; मुळुंड ते सावरी व्हाया पुणे


पुणे: मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एका  शेडवर छापा टाकत मेफेड्रोन जप्त केले असून  या कारवाईत तीन आरोपींना  अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे  यांच्या नावावर असलेल्या तेज यश हॉटेलमधून जेवण पुरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सावरी ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

पोलिसांचा तपास

दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात मुंबईतील मुलुंड येथून झाल्याचे तपासातून समोर आले आहे. 8 डिसेंबर रोजी मुलुंडच्या विजयनगर परिसरातील गणेश कृपा बिल्डिंगसमोरील फूटपाथवर दोन इसम संशयास्पदरीत्या वावरताना मुंबई पोलिसांना आढळले. चौकशीत त्यांनी आपली नावे सलीम अब्दुल हमीद शेख वय 32 आणि रईस शेख वय 37 असल्याचे सांगितले. तपासादरम्यान सलीम शेखकडे असलेल्या पिशवीत आणि त्याच्या कपड्यांच्या खिशात एकूण 74 ग्रॅम मेफेड्रोन सापडले. तर रईस शेखकडे 62 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. 

अजितदादांच्या शहरप्रमुखाला अटक
पोलिस चौकशीत दोघांनी हे अमली पदार्थ पुण्यातील विशाल मोरे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सापळा रचत 13 डिसेंबर रोजी पुणे-मुंबई महामार्गावर विशाल मोरे याला मेफेड्रोनसह अटक केली. चौकशीत विशाल मोरे याने हे ड्रग्ज सातारा जिल्ह्यातील सावरी गावात तयार केले जात असल्याची माहिती दिली.  या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापा टाकला. गुरांच्या गोठ्यासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन तयार केले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून अब्बास सय्यद उर्फ सद्दाम वय 29, राजिकूल रेहमान वय 30 आणि हाबिजुल इस्लाम वय 25 यांना अटक करण्यात आली.

पुण्यात पुढच्या 48 तासांत मोठा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा विषय होणार क्लीअर; अजितदादांच्या बैठकीने खळबळ विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या विशाल मोरेची 3 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे विद्यार्थी आघाडी शहरप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. तसेच सावरी गावातील शेडवर काम करणाऱ्या आरोपींना ओंकार डिगे नावाचा युवक जेवण पुरवत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. हे जेवण तेज यश रिसॉर्टमधून येत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र मुंबई पोलिसांनी काढलेल्या प्रेसनोटनुसार ओंकार डिगे याची चौकशी करण्यात आली असून त्याचा या प्रकरणात कोणताही सहभाग आढळून आलेला नाही, त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.