Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतदानासाठी काही पण! दीड लाख खर्च करून थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला मतदान करून लगेच परतला

मतदानासाठी काही पण! दीड लाख खर्च करून थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला मतदान करून लगेच परतला


सांगली : मतदानाला जाण्यापूर्वी वर किंवा वधू मतदान करतात, असे चित्र आपण नेहमी पाहतो. एवढेच कशाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी परदेशातूनही लोक येतात. त्यावेळी ते भारतात दीर्घ मुक्काम करतात. मात्र, सांगली जिल्ह्यातील एका युवकाने मतदानाचे महत्त्व लक्षात घेत तब्बल दीड लाख रुपये मोजले आहे आणि स्वत:चे 24 तास खर्च केले आहेत.

या युवकाचं नाव आहे अन्सार कासम मुल्ला. अन्सार ऑस्ट्रेलियात राहतो. तो मेलबर्नमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करत आहे. त्याला जेव्हा कळले की आपल्या गावात नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे तेव्हा त्याने कशाचीही पर्वा न करता मतदानासाठी तो भारतात आला. मतदान केल्यानंतर तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला निघाला आहे. केवळ मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही टीकावी, याच हेतूने त्यांने हे मतदान केले आहे.

अन्सार कासम मुल्ला हा 30 वर्षांचा युवक आहे. त्याचे वडील कासम मुल्ला शिराळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांतर एमटेक झालेला अन्सार ऑस्ट्रेलियाला गेला आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करत आहे. मतदानाची तारीख २ डिसेंबर आहे, असे त्याला कुटुंबीयांकडून समजल्यानंतर त्यान मतदानाला शिराळ्यात (सांगली) जाण्याचा निर्णय घेतला. 

'मतदान हे श्रेष्ठ दान आहे', हे फक्त बोलण्यासाठी नाही, हे शिराळ्यातील अन्सार मुल्ला याने दाखवून दिले आहे. अन्सार कासम मुल्ला 2019 पासून मेलबर्नमध्ये नोकरी करत आहे. मात्र, खास नगरपंचायतीच्या मतदानासाठी त्यांने तो मेलबॉर्न ते सांगली असा 24 तासांचा प्रवास केला. मेलबर्न ते क्लालालांपूर ते मुंबई आणि पुढे सांगली-शिराळा असा प्रवास करून तो आला. त्यासाठी त्यांनी खिशातील दीड लाख रुपये खर्च केले आहेत. हे सर्व केवळ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांने केले आहे. तो शिराळ्यात आल्यानंतर त्याच्या मित्रांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे स्वागत केले. शिराळ्यात कन्या शाळेत त्यांने मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर लगेचच तो मेलबर्न, ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.