“गरिबांचा घाम, अधिकाऱ्यांचा घोटाळा!” वर्ग–ड भरतीत अब्जावधींचा भ्रष्टाचार? हजारो उमेदवारांना जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडले – 31 डिसेंबरची परीक्षा म्हणजे प्रशासनाचा क्रूर विनोद!
सांगली / मिरज : सांगली व मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत होणाऱ्या वर्ग–ड (Class-IV) पदभरती प्रक्रियेत भयंकर गैरप्रकार, आर्थिक भ्रष्टाचार व प्रशासनाची निर्लज्ज मनमानी उघडकीस आली आहे.
दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा म्हणजे गरीब, कष्टकरी, वंचित घटकांच्या तोंडावर फेकलेला अन्यायाचा चिखल असल्याचा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांनी केला आहे.
“परीक्षा नाही – हा मानसिक छळाचा कट आहे!”
उमेदवारांनी अर्जात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्हे निवडले असतानाही त्यांना थेट मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर येथे परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. ही चूक नव्हे, हा पूर्वनियोजित कट आहे. ही अकार्यक्षमता नव्हे, हा प्रशासनाचा गुन्हा आहे. हजारो रुपये खर्च करून, कर्ज काढून, रोजंदारी सोडून परीक्षा देणाऱ्या तरुणांना जाणूनबुजून अडचणीत टाकण्यात आले आहे.
पैशासाठी परीक्षा केंद्रांची दलाली?
विश्वसनीय माहितीनुसार – काही “निवडक” उमेदवारांना मात्र जवळचीच केंद्रे देण्यात आली आहेत.
यातून स्पष्ट होते की – पैसे देणाऱ्यांना सवलत गरिबांना शिक्षा अधिकारी–एजन्सी यांचे संगनमत
हा थेट भ्रष्टाचाराचा खेळ असून यामध्ये भारतीय न्याय संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे गंभीर उल्लंघन झाले आहे.
संविधानाची पायमल्ली – प्रशासन मुजोर
ही संपूर्ण प्रक्रिया खालील अधिकारांवर घाला घालणारी आहे :
▪️ अनुच्छेद 14 – समानतेचा अधिकार
▪️ अनुच्छेद 16 – समान संधीचा अधिकार
▪️ अनुच्छेद 21 – सन्मानाने जगण्याचा अधिकार
“गरीब असणे हा गुन्हा नाही – पण सरकारने तसे वागवणे हा गुन्हा आहे!”
आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगार - कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन युनियनच्या ठाम मागण्या सादर केला आहेत.
✅ 31 डिसेंबर 2025 ची परीक्षा तात्काळ रद्द करा✅ उमेदवारांनी निवडलेल्या जिल्ह्यातच परीक्षा घ्या✅ संपूर्ण भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करा✅ दोषी अधिकारी, एजन्सी व दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करा✅ पीडित उमेदवारांना नुकसानभरपाई द्याइशारा – हा फक्त इशारा आहे!जर तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही तर,* उच्च न्यायालयात जनहित याचिका* लोकायुक्त व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात तक्रार* राज्यव्यापी आंदोलन व रस्त्यावर उतरण्याचा इशारादेण्यात येत आहे, याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी.“ही लढाई नोकरीसाठी नाही… न्यायासाठी आहे!”
— वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हाप्रशांत वाघमारे – पश्चिम महाराष्ट्र महासचिव, संजय भूपाल कांबळे – जिल्हा संपर्कप्रमुख,संजय संपत कांबळे – जिल्हाध्यक्ष,जगदिश कांबळे – जिल्हा कार्याध्यक्ष,अनिल मोरे सर – जिल्हा महासचिव, किशोर आढाव - जिल्हा उपाध्यक्ष यांच्या बरोबर किरण मोरे, राजू जाधव, महोन गवळी, दशरथ गायकवाड, वैभव कांबळे, सचिन कांबळे, बापू वाघमारे, प्रतिक सदामते, प्रभाकर कांबळे, सतिश कांबळे, अक्षयकुमार कांबळे यांच्याबरोबर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिक्षा देणारे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.