Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचा बालेकिल्ला हादरला! वसंतदादांच्या 'पणतू'ला भाजपकडून थेट आव्हान

काँग्रेसचा बालेकिल्ला हादरला! वसंतदादांच्या 'पणतू'ला भाजपकडून थेट आव्हान


सांगली : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला प्रभाग ११ यंदाची निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. गेल्यावेळी चारही जागा काँग्रेसने जिंकलेल्या. त्यातील तीन माजी नगरसेवक सध्या भाजपवासी झाले आहेत. त्यातील विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक राहिलेले मनोज सरगर यंदा त्याच दादा घराण्याला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. विशाल पाटील यांचे पुतणे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील या प्रभागातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यातून वसतदादा घराण्याची चौथी पिढी राजकारणात आगमन करेल अशी चिन्हे आहेत.

संजयनगर, चिंतामणीनगरसह औद्योगिक वसाहत, राम रहिम कॉलनी, माळबंगला, घनश्याम नगर, जगदाळे प्लॉट, साखर कारखाना परिसर या प्रभागात येतो. याच प्रभागात खासदार विशाल पाटील, भाजप नेत्या केळकर यांचे निवासस्थान आहे.

मात्र, काँग्रेसचे होमपीच म्हणून या प्रभागाची ओळख आहे. परंतु, जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच खासदार विशाल पाटील यांचे समर्थक मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या सोबत माजी महापौर कांचन कांबळे आणि शुभांगी साळुंखे या दोन माजी नगरसेवकांनीही प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या होम पिचवरच धक्का भाजपने दिला आहे.

आता महापालिकेच्या आरक्षणात या प्रभागात सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला हे दोन आरक्षण आहेत त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे मनोज सरगर यांना सर्वसाधारण प्रवर्गातून रिंगणात उतरावे लागणार असल्याची चिन्ह आहेत. परंतु, या प्रवर्गात भाजपमधून नीता केळकर यांचे पुत्र सारंग, माजी महापौर किशोर शहा आणि तसेच शुभांगी साळुंखे यांचे पती महेश साळुंखे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यापासूनच येथे स्पर्धा आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडून खासदार विशाल पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे एकेकाळी दादा घराण्याचे कट्टर समर्थक राहिलेले मनोज सरगर आता दादाघराण्यालाच आव्हान देणार का ही उत्सुकता आहे. याशिवाय नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले विलास सर्जे हेही इच्छुक आहेत, तर भाजपकडून मदनभाऊ युवा मंचचे माजी अध्यक्ष आनंदा लेंगरे यांच्या पत्नी माया लेंगरे, माजी महापौर कांचन कांबळे यांचे दीर संजय कांबळे हेही इच्छुक आहेत.

संजय कांबळे यांच्यामुळे आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजितकुमार काटे यांच्यासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप नेते हा पेच कसा सोडवणार याकडे लक्ष आहे. एकूणच काँग्रेसचा प्रभाव असलेल्या या प्रभागात भाजप काँग्रेसचेच माजी शिलेदार त्यांच्यासमोर उभे करणार की, मूळ भाजप कार्यकर्त्यांना संधी देणार याची उत्सुकता आहे.

अ : अनुसूचित जाती : संजय कांबळे, सुजीतकुमार काटे. ब : ना.मा.प्र. महिला : माया लेंगरे, प्रतिभा माने, धनश्री अक्कीमडी क : सर्वसाधारण महिला : सुप्रिया साळुंखे, अचिनी तारळेकर, शुभांगी साळुंखे, ड : सर्वसाधारण : सचिन पाटील, मनोज सरगर, सारंग केळकर, अक्षय पाटील, किशोर शहा, दीपक माने, चंद्रकांत चव्हाण (उमेश खोत), महेश साळुंखे, यश अक्कीमडी परिसर : चिंतामणीनगर, औद्योगिक वसाहत, राम रहिम कॉलनी, संजयनगर, माळबंगला. आरक्षण : अ- अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.
एकूण मतदार २१,१७२ पुरुष मतदार : १०६४९ महिला मतदार : १०५१८ इतर मतदार : ५ त्यावेळी त्यांच्या सोबत माजी महापौर कांचन कांबळे आणि शुभांगी साळुंखे या दोन माजी नगरसेवकांनीही प्रवेश केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.