Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता मोबाईलवर डाऊनलोड करा तुमचं मतदार ओळखपत्र; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

आता मोबाईलवर डाऊनलोड करा तुमचं मतदार ओळखपत्र; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया


राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत पात्र मतदारांना मतदार ओळखपत्र किंवा वोटर आयडीची आवश्यकता पडेल. जर तुमच्याकडे फिजीकल कॉपी नसेल तर तुम्ही हे मतदार ओळखपत्र डिजीटल स्वरूपात देखील मिळवू शकता. किराणा सामान ऑर्डर करण्यापासून ते बँकेच्या व्यवहारांपर्यंत आपण सर्वकाही मोबाईलवर अगदी सहज करतो, याप्रमाणेच आता वोटर आयडी कार्डदेखील मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. वोटर आयडी कार्ड मोबाईलवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. ते कसे डाउनलोड करायचे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

वोटर आयडी डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटचा वापर करत असाल तर तुमच्या फोन नंबर वापरून तुम्ही निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करू शकता.
नोंदणी केल्यानंतर ‘डाउनलोड इ-एपिक’ पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा एपिक क्रमांक म्हणजेच वोटर आयडीवर असणारा युनिक आयडी नंबर तिथे सबमिट करा.
त्यानंतर तुमचा डिजिटल वोटर आयडी डाउनलोड होईल.
डिजिटल वोटर आयडी डाउनलोड करण्यासाठी तुमचा फोन नंबर वोटर आयडीशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचा वोटर आयडी फोन नंबरशी लिंक नसेल तर सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तो लिंक करू शकता. कोणत्या आहेत त्या स्टेप्स जाणून घ्या.

वोटर आयडीशी मोबाईल नंबर कसा लिंक करावा?

पहिल्यांदा https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, होमपेजवरील ‘Forms 8’ हा पर्याय शोधा.
त्यानंतर ‘फॉर्म ८’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘सेल्फ’ किंवा ‘फॅमिली पर्याय निवडुन त्यात तुम्हाला हवे असलेले पर्याय निवडा.
त्यानंतर ‘Correction Of Entries In The Existing Electoral Roll’ या पर्यायावर क्लिक करा.
तिथे तुम्हाला जो फोन नंबर वोटर आयडीशी लिंक करायचा आहे, तो सबमिट करा.
फोन नंबर लिंक होण्यासाठी थोडा वेळ लागेल.
नंबर लिंक झाल्यानंतर https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा आणि EPIC नंबर सबमिट करून डिटेल्स वेरीफाय करा.
त्यानंतर ‘ओटीपी’द्वारे नंबर व्हेरीफाय करून ‘इ-एपिक’ डाउनलोड करा.
अशाप्रकारे फोन नंबर आणि वोटर आयडी लिंक करता येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.