Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! 1 हजार रुपयांची पेन्शन आता थेट 5 किंवा 10 हजार होणार

पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! 1 हजार रुपयांची पेन्शन आता थेट 5 किंवा 10 हजार होणार


"बजेट २०२६ मध्ये सर्वसामान्यांच्या खिशात पैसा खेळता ठेवण्यासाठी सरकार 'बड्या' घोषणांच्या तयारीत आहे. मात्र, या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगतेय ती म्हणजे 'EPS-95' पेन्शनधारकांच्या नशिबाची! गेल्या दशकापासून १,००० रुपयांच्या टप्प्यावर अडकलेली किमान पेन्शनची सुई आता ५,००० की १०,००० वर जाऊन स्थिरावणार? महागाईच्या या रणधुमाळीत पेन्शनधारकांना 'अच्छे दिन' येणार की पुन्हा पदरी निराशाच पडणार, याचे गुपित आता अर्थसंकल्पाच्या पोटात दडले आहे." यामुळेच देशातील लाखो खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे डोळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी 'बजेट २०२६' कडे लागले आहेत. सध्या मिळणारी किमान १,००० रुपये पेन्शन वाढवून ती ५,००० ते १०,००० रुपये करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त गुडरिटर्न्सने दिले आहे.

महागाईच्या काळात १००० रुपये अपुरे; पेन्शनधारकांचा संताप

गेल्या ११ वर्षांत महागाई गगनाला भिडली आहे, मात्र ईपीएस-९५ (EPS-95) योजनेअंतर्गत मिळणारी किमान पेन्शन आजही १,००० रुपये इतकीच मर्यादित आहे. कर्मचारी संघटनांनी ही रक्कम किमान ७,५०० ते १०,००० रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे. वाढत्या राहणीमानाचा खर्च आणि वैद्यकीय गरजा पाहता सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात पेन्शनमध्ये ५ ते १० पटीने वाढ करून मोठा दिलासा देऊ शकते.

५,००० की १०,०००? काय आहे प्रस्ताव?
प्रस्ताव १ (५,००० रुपये): गुडरिटर्न्सनुसार, वाढती महागाई पाहता किमान पेन्शन ५,००० रुपये करण्याचा प्राथमिक विचार सरकार करू शकते. यामुळे तिजोरीवर मर्यादित भार पडेल आणि पेन्शनधारकांनाही आधार मिळेल.

प्रस्ताव २ (१०,००० रुपये): विविध कर्मचारी संघटनांनी ७,००० ते १०,००० रुपयांची मागणी केली आहे. जर सरकारने 'कंझम्पशन' (उपभोग) वाढवण्यावर भर दिला, तर हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
सरकारची भूमिका आणि बजेटमधील अपेक्षा

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सरकार सध्या १.१६% बजेटरी सपोर्ट देऊन १,००० रुपये पेन्शनची हमी देत आहे. मात्र, आगामी 'बजेट २०२६' हे लोकांच्या हातात अधिक पैसा देणारे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच ईपीएफओ (EPFO) पेन्शनबाबत ऐतिहासिक घोषणा होऊ शकते.

EPS-95 योजना काय आहे?
कर्मचारी पेन्शन योजना (EPS) १९९५ अंतर्गत, ज्या कर्मचाऱ्यांनी किमान १० वर्षे सेवा पूर्ण केली आहे, त्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते. यात नियोक्ता (मालक) पगाराच्या ८.३३% हिस्सा पेन्शन फंडात जमा करतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.