Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमचा खिसा रिकामी होण्यापूर्वी हे नक्की वाचा! 1 फेब्रुवारीपासून लागू होतायत 5 नवीन नियम; प्रत्येक घरावर होणार परिणाम!

तुमचा खिसा रिकामी होण्यापूर्वी हे नक्की वाचा! 1 फेब्रुवारीपासून लागू होतायत 5 नवीन नियम; प्रत्येक घरावर होणार परिणाम!


फेब्रुवारी महिन्याची सुरुवात यंदा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या बदलांसह होणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून देशात काही नवीन नियम लागू होणार असून त्याचा थेट परिणाम प्रत्येक घराच्या बजेटवर आणि खिशावर होणार आहे. स्वयंपाकघरातील गॅसपासून प्रवास, वस्तू आणि बँकिंग सेवांपर्यंत अनेक बाबी बदलणार आहेत. त्यामुळे तुमचा खर्च वाढण्यापूर्वी हे बदल जाणून घेणे गरजेचे आहे.

पहिला बदल घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींबाबत आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या गॅस सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतात. 1 फेब्रुवारी रोजी नवीन दर जाहीर होणार असून 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत चढ-उतार होताना दिसत आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाली होती. त्यामुळे घरगुती गॅस स्वस्त होतो की महाग, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
दुसरा बदल CNG, PNG आणि हवाई इंधनाच्या किमतींशी संबंधित आहे. 1 फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन फ्युएलचे नवीन दर जाहीर होतील. हवाई इंधनाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या, तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकिटांवर होतो. याशिवाय CNG आणि PNG च्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम वाहनचालक आणि घरगुती गॅस वापरणाऱ्यांवर होऊ शकतो.

तिसरा बदल पान-मसाला आणि सिगरेट वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक ठरणार आहे. 1 फेब्रुवारीपासून तंबाखूजन्य पदार्थ आणि पान-मसाल्यावर अतिरिक्त कर लागू होणार आहे. सरकारने जीएसटी व्यतिरिक्त नवीन उत्पादन शुल्क आणि उपकर जाहीर केला आहे. आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लावण्यात येणाऱ्या या उपकरामुळे या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. चौथा बदल FASTag वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक आहे. 1 फेब्रुवारीपासून कार, जीप आणि व्हॅनसाठी FASTag घेताना केवायसी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन FASTag घेणे अधिक सोपे होणार आहे.
पाचवा बदल बँकिंग सेवांशी संबंधित आहे. फेब्रुवारी महिन्यात साप्ताहिक सुट्ट्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसारख्या कारणांमुळे जवळपास 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामांसाठी आधीच सुट्यांची यादी पाहून नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.