Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्तासुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

सांगली :- शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद


सांगली  दि. 30 : मिरज तालुक्यातील खंडाळा - पळशी - कराड - कुंडल - सांगली -अंकली रामा क्रं 142 किमी 173/500 ते 174/500 (भाग शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी) हा रस्ता सुधारणा काम पूर्ण करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी 2026 ते दिनांक 30 जुलै 2026 या कालावधी दरम्यान वाहतुकीस बंद करून पुढील अटी व शर्तीचे अधीन वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी निर्गमित केले आहेत. मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
 
पर्यायी वाहतूक मार्ग

इस्लामपूरकडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी - शिवशंभो चौक - जुना बुधगाव रोड - पट्टणशेट्टी होंडा शोरुम - टी. व्ही. एस. शोरुम – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल. पलूस-कुंडल कडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी - शिवशंभो चौक - जुना बुधगाव रोड - पट्टणशेट्टी होंडा शोरुम -  टी.व्ही.एस. शोरूम – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल. 

अटी व शर्ती – नमूद ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला "काम चालु असल्याने रस्ता वाहतुकीस बंद" असा मोठ्या आकारातील माहितीदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसरात ज्या ज्या ठिकाणाहून वाहतुक वळविली जाणार आहे त्या सर्व ठिकाणी माहितीदर्शक फलक दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नमुद सर्व ठिकाणी मोठ्या आकाराचे रेडीयमयुक्त दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स लावणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित ठेकेदार यांनी 24 तासांकरिता त्यांच्याकडील सुरक्षा रक्षक नेमणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यावर विद्युत पुरवठा चालू राहिल याची ठेकेदार यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. नमुद ठिकाणी काम चालू असताना अपघात झाल्यास किंवा अन्य प्रकारे अनुचित प्रकार घडल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदार हे त्याकरिता सर्वस्वी जबाबदार राहतील, असे आदेशात म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.