Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँकेतील लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त :, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली जिल्हा बँकेतील लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त :, सांगली एलसीबीची कारवाई


आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर फोडून त्यातील दागिन्यासह ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. यामध्ये उत्तरप्रदेश सांगली जिल्ह्यातील पलूस येथील संशयितांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 3.25 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सांगली एलसीबीच्या चमुने केलेल्या या कारवाईचे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कौतुक केले. उत्तरप्रदेश येथील अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करू असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.

राहुल रंजमीश शर्मा (वय २७, रा. गाव ककराला, ता. जि. बधायु, उत्तर प्रदेश), विश्वजीत विजय पाटील (वय २४, रा. बांबवडे, ता. पलुस, जि. सांगली), संकेत अरुण जाधव (वय २६, रा. बलवडी, ता. खानापुर, जि. सांगली), इजाज राजु आत्तार (वय ३०, रा. आमनापुर, ता. पलुस, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 7 जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरने फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तातडीने तपास करून संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस तसेच एलसीबीला दिल्या होत्या. घटनास्थळावरील गॅस कटर बाबत सखोल तपास केल्यावर तो कटर पलूस येथून आणल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार तसेच तांत्रिक तपास केल्यावर पाटील, जाधव, आत्तार यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर विजय पाटील हा पूर्वी उत्तरप्रदेश येथे गलाईचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच उत्तरप्रदेश येथील शर्मा याच्यासह त्याच्या साथीदारांना चोरीसाठी बोलावून घेतल्याचे स्पष्ट झाले. तसेच उत्तरप्रदेश येथील काहीजण पलूस येथील लॉजवर राहिल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर एलसीबीचे सहायक निरीक्षक पंकज पवार, जयदीप कळेकर यांची दोन पथके संशयितांना पकडण्यासाठी उत्तरप्रदेश येथे पाठवण्यात आली.

पथकांनी शर्मा याला ताब्यात घेऊन दागिने जप्त केले. त्याचे अन्य साथीदार पसार झाले असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले. चारही संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, एक गावठी कट्टा, चार काडतूसे, गॅस सिलिंडर, स्कॉर्पिओ (डी एल 10 सीएफ 9268) असा 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या पंकज पवार, जयदीप कळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अमिरशा फकीर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतिश माने, मच्छिद्र बर्डे, संदिप गुरच, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सुरज थोरात, केरुबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, शिवाजी सिद, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.