मुंब्रा : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला. या प्रभागातून (एमआयएम) पक्षाच्या उमेदवार सहार शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. त्यांचा विजय जितका लक्षवेधी ठरला, तितकंच त्यांच्या विजयानंतरचं भाषणही चर्चेचा विषय ठरत आहे. भाषणात त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सहार शेख हे नाव राज्यभर चर्चेत आलं.
राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब
सहार शेख यांचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते आणि ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीकडून त्यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती.
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही
सहार शेख यांनी सांगितल्यानुसार, सुरुवातीला त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आधी शब्द दिला होता, मात्र नंतर तो शब्द पाळला नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि AIMIMकडून मैदानात उतरल्या. निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.सहर शेख यांची माहिती (प्रोफाईल)पूर्ण नाव: सहार युनूस शेखवय: 29 वर्षशिक्षण: बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (BBM), मुंबई विद्यापीठ (2017)व्यवसाय: कार वॉशिंग सेंटरएकूण संपत्ती: अंदाजे 6,98,840 रुपयेसोने: 120 ग्रॅम (अंदाजे 12 लाख रुपये)कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: 23,43,012 रुपये
मुंब्र्याच्या राजकारणातला नवा चेहरा
मुंब्रा परिसरात स्थानिक पातळीवर राजकारण खूप सक्रिय आहे. अशा ठिकाणी सहार शेख यांनी मिळवलेला विजय महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या नगरसेविका म्हणून त्या पुढे कोणते मुद्दे घेऊन काम करतात आणि स्थानिक समस्यांवर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.