महिन्याला रिचार्ज करायची कटकट संपली! अवघ्या 44 रुपयांत Jio सिम वर्षभर ठेवा अॅक्टिव्ह, पाहा 'ही' भन्नाट ट्रिक
मोबाईल रिचार्ज महागल्याने सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठीजास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच आपल्याकडे दोन सिम कार्ड असतील तर खर्चात आणखी वाढ होते. पण तुम्ही जिओ युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.
कारण, तुम्ही अवघ्या 44 रुपयांत आपले सिम कार्ड 365 दिवस म्हणजेच वर्षभर अॅक्टिव्ह ठेवू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त 44 रुपयांत तुमचे जिओ सिम संपूर्ण वर्षभर अॅक्टिव्ह ठेवू शकता आणि इन्कमिंग कॉल, ओटीपी येत राहू शकता. जाणून घ्या कसे...
जिओचे सिम कार्ड 44 रुपयांत वर्षभर सुरू ठेवण्याची ट्रिक
सर्वप्रथम, हे समजून घ्या की हा जिओचा प्लान अधिकृत नाहीये जो तुम्हाला अॅपमध्ये मिळेल. ही एक खास ट्रिक आहे. भारतात, जर प्रीपेड नंबरवर 90 दिवसांसाठी कोणतीही अॅक्टिव्हिटी (रिचार्ज किंवा वापर) नसेल, तर कंपनी तो नंबर बंद करू शकते. या नियमावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.
तुम्हाला फक्त हे करावं लागेल
जिओकडे 11 रुपयांचे एक लहान डेटा व्हाऊचर आहे. हे व्हाऊचर तुम्हाला 1तासाचा हाय-स्पीड डेटा देते. खास बाब म्हणजे, हे व्हाऊचर बेस प्लानशिवाय देखील काम करते. तुम्हाला तुमचा जिओ नंबर 1 रुपयांमध्ये रिचार्ज करावा लागेल. या प्लान अंतर्गत, तुम्हाला 1 तासासाठी 10 जीबी हाय-स्पीड इंटरनेट मिळेल आणि यासह, तुम्ही पुढील 90 दिवसांसाठी तुमचा नंबर रिचार्ज करण्याच्या चिंतेपासून मुक्त व्हाल. कारण 11 रुपयांचा रिचार्ज वापरुन तुम्ही तुमचा नंबर अॅक्टिव्ह आहे आणि वापरात आहे असे दर्शवतो.तुमच्याकडे समजा दोन सिम कार्ड असतील तर एक्स्ट्रा असलेले सिम कार्ड असेच वापरा. जेव्हा या सिममधील रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी संपून जवळपास 80 ते 90 दिवस (पूर्ण 90 दिवस होणार आहेत) होणार आहेत. तेव्हा अलर्ट व्हा. 90 दिवस संपण्यापूर्वी 11 रुपयांच्या व्हाऊचरने तुमचा नंबर पुन्हा रिचार्ज करा. तुम्ही रिचार्ज करताच, काही काळासाठी इंटरनेट चालू करा आणि काही KB डेटा वापरा. हे जिओच्या सिस्टमला सिग्नल पाठवेल की नंबर अॅक्टिव्ह आहे आणि कोणीतरी तो वापरत आहे. आता तुम्ही पुढील 90 दिवसांसाठी सुरक्षित आहात. तुम्हाला हे वर्षातून चार वेळा करावे लागेल. म्हणजेच 11 रुपयांचे चार वेळा रिचार्ज केल्यास तुम्हाला 44 रुपये खर्च येईल आणि तुम्ही आपले सिम कार्ड 44 रुपयांत वर्षभर अॅक्टिव्ह ठेवू शकता.
ही ट्रिक कोणाच्या कामाची?
ही ट्रिक प्रत्येकासाठी नाहीये. जर तुम्हाला त्या नंबरचा वापर करून दररोज मित्रांना कॉल करायचे असेल किंवा व्हिडिओ पाहायचे असतील तर ते तुमच्यासाठी काम करणार नाही. ही ट्रिक फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांचा जुना नंबर बंद करायचा नाही. त्यांना फक्त इन्कमिंग कॉल आणि एसएमएस / ओटीपी मिळवायचे आहेत. अत्यंत महत्त्वाचे - जेव्हा जेव्हा कंपन्यांना असे कळते की, लोक अशा प्रकारे प्लानचा फायदा घेत आहेत, तेव्हा ते नियम बदलू शकतात. उद्याहर्णार्थ जिओ एक नियम बनवू शकते की 11 रुपयांचा रिचार्ज फक्त बेस प्लान अॅक्टिव्ह असेल तरच वैध असेल. म्हणून, जोपर्यंत ही ट्रिक काम करत आहे तोपर्यंत तुम्ही पैसे वाचवू शकता. परंतु रिचार्जची तारीख लक्षात ठेवा; अन्यथा, जर तुम्ही 90 दिवसांची अंतिम मुदत चुकवली तर तुमचा नंबर गमावू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.