सांगली : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली करिता नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांकरिता एम एच १० ई व्ही (EV) ही नवीन मालिका मंगळवार, दिनांक ०६ जानेवारी २०२६ पासून सुरु करण्यात येणार आहे. ही माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, एम एच १० ई व्ही (EV) ही नवीन मालिका मंगळवार, दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी चार चाकी वाहनांकरिता सुरू होत आहे. या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांकरिता आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या ५ (अ) मध्ये विहित केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत - आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन ४.० या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आहे.पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DY. RTO SANGLI) या नावे सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत निर्धारीत फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल, त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.