नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तिवेतनधारकांना8व्या वेतन आयोगाबाबत अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. माध्यमांमध्ये 1 जानेवारी2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झाल्याच्या चर्चा सुरू असल्या, तरी प्रत्यक्षात पगार किंवा भत्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपला असला, तरी त्यानंतर लगेचच नवीन वेतनरचना लागू होतेच असे नाही. सरकारी प्रक्रियेनुसार वेतन आयोग लागू होण्यासाठी अधिसूचना, शिफारशी आणि अंमलबजावणीचा स्वतंत्र टप्पा असतो.
1जानेवारी2026 महत्त्वाची तारीख का?
मागील वर्षी काढण्यात आलेल्या एका अधिकृत परिपत्रकात नमूद करण्यात आले होते की, साधारणपणे दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातात. त्या परंपरेनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा प्रभाव 1जानेवारी2026 पासून अपेक्षित आहे.याचा अर्थ असा की, जरी नवीन वेतनश्रेणी प्रत्यक्षात नंतर लागू झाली, तरी कर्मचाऱ्यांना लाभ या तारखेपासून मागील कालावधीसाठी (arrears) दिला जाईल.
अधिसूचना कधी येण्याची शक्यता?
सूत्रांनुसार, 8व्या वेतन आयोगाबाबतची अधिकृत अधिसूचना2026 च्या दुसऱ्या सहामाहीत किंवा 2027 च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पगारवाढतात्काळलागू न होता काही महिने किंवा वर्षभर उशिरा लागू होऊ शकते.
मे 2027 मध्ये अंमलबजावणी झाली तर काय?
जर 8वा वेतन आयोग मे2027 पासून प्रत्यक्षातलागू झाला, तर केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तिवेतन धारकांना जानेवारी2026 ते एप्रिल 2027 या कालावधीसाठी थकबाकी मिळेल.कायदेशीर तज्ज्ञ रोहित जैन (Singhania & Co) यांच्या मते, शिफारशी1जानेवारी2026 पासून लागू मानल्या गेल्याने, अंमलबजावणीतहोणाऱ्या विलंबामुळे जमा झालेली रक्कम एकरकमी थकबाकी म्हणून दिली जाते.
थकबाकी कशी मोजली जाते?
अर्थतज्ज्ञ मदनसबनवीस सांगतात की, सरकार सहसा अर्थसंकल्पात अशा थकबाकीसाठी तरतूद करते. थकबाकी ही केवळ मूळ पगारावर नाही, तर सुधारित एकूण वेतनावर (basic + allowances) आधारित असते.
उदाहरणार्थ:एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार 45,000रुपयांवरून50,000रुपयेझाला.
तर दरमहा फरक = 5,000रुपये
अंमलबजावणीला15 महिने उशीर झाला,
तर एकूण थकबाकी = 5,000× 15 = 75,000रुपये
थोडक्यात काय?
जानेवारी2026 पासून पगार वाढलेला नाही8वा वेतन आयोग आपोआप लागू होत नाहीअंमलबजावणी उशिरा झाली तरी थकबाकी मिळणारथकबाकी संपूर्ण सुधारित वेतनावर मोजली जाईलसरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायकबाब म्हणजे, वाढ उशिरा मिळाली तरी पैसे जाणार नाहीत; फक्त थोडा संयम ठेवावा लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.