पोलिस दलात मोठी उलथापालथ; एकाचवेळी तब्बल 50 'आयपीएस' अधिकाऱ्यांना 'प्रमोशन'; धडाकेबाज अधिकाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत परतलेल्या महायुती सरकारच्या दुसर्या टर्ममध्ये प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले जात आहे.वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात धडाकाच सुरू असल्यानं प्रशासनात चर्चांना उधाण आलं आहे.
याचदरम्यान, महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या 3 जानेवारी 2026 ला सेवानिवृत्त झाल्या आहेत. शुक्ला यांच्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांनी पदभार स्विकारला आहे. याचदरम्यान, पोलिस दलातून आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील मोठ्या उलथापालथीनंतर आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. योगी सरकारनं एकाचवेळी 50 आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं आहे. बढती मिळालेल्यांमध्ये 2013 बॅचचे 28 तर 2012च्या 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात 1 जानेवारी रोजी 50 आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना बढती मिळाल्यानं संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नव्या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर संबंधित बदल्या होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर प्रमोशन मिळालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षक पदापर्यंत बदल्या होण्याची शक्यता आहे.यात 2013 बॅचच्या 28, 2001 बॅचच्या 3 ,2008 बॅचच्या सहा अधिकाऱ्यांची थेट आयजी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तर 2012 बॅचच्या 13 आयपीएस अधिकाऱ्यांच्या एसएसपी ते डिआयजी पदावर बढती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. येत्या काही दिवसांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश निघण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळालेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण कुमार, तरुण बाबा, किरण एस, आशुतोष कुमार, आनंद कुलकर्णी, एन कुलांची, अमित वर्मा, राजीव मल्होत्रा आणि अखिलेश निगम या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.