'तुम्हाला माझे न्यूड फोटो हवेत? मी..', अश्लील AI फोटो व्हायरल करणाऱ्यांना सीमा आनंद यांचा सवाल, सोशल मीडियावर चर्चा
कथाकार आणि रिलेशनशिप एक्स्पर्ट सीमा आनंद यांची सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चा आहे. याचं कारण त्यांचे काही AI जनरेटेड अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली. यात त्यांनी स्त्री पुरुष शरीरसंबंध, लिव्ह इन मध्ये राहणं योग्य की अयोग्य, लग्नानंतरचं वैवाहिक जीवन अशा विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली होती. ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर सीमा आनंद यांचे AI च्या मदतीने अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले. ज्यानंतर सीमा आनंद यांनी अश्लील फोटो तयार करणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे सीमा आनंद यांनी?
"मागच्या आठवड्यात माझे काही फोटो AI च्या मदतीने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. लोकांची मानसिकता किती घाणेरडी आहे आणि किळसवाणी आहे हे मला यावरुन समजलं. मी पोलिसांत तक्रार दिली आहे. पण मी जेव्हा ते फोटो पाहिले आणि कमेंट वाचल्या तेव्हा मला जाणवलं की या लोकांची मानसिकता किती घाणेरडी आहे. माझ्या त्या फोटोंवर लोक ज्या प्रकारे कमेंट करण्यासाठी तुटून पडले मला वाटलं हे काय मानसिकतेचे लोक आहेत? एक युजर कमेंट करत म्हणाला, ही काही एवढी वाईट नाही. माझा एका मुलीसह फोटो घेतला आणि चेहरे बदलले. मी साडी नेसले होते आणि ती शॉर्ट्स मध्ये होती. माझ्या चेहऱ्याला तिचा चेहरा तिच्या चेहऱ्याला माझा चेहरा लावला. हे करुन तुम्ही काय साधलंत? काय मिळवलंत? माझं हे स्पष्ट मत आहे की बलात्काऱ्यांची मानसिकता आहे. असे कपडे घातलेच तर तू निमंत्रणच देते आहेस ना? मुलींची आणि महिलांचीच चूक असते. होय आम्ही हे मान्य केलं आहे." AI च्या मदतीने बनावट अश्लील फोटो पोस्ट केल्याने सीमा आनंद यांचा संताप (फोटो-सीमा आनंद, इन्स्टाग्राम)
मी ६३ वर्षांची आहे तुम्हाला माझे न्यूड्स हवेत?
AI च्या मदतीने साडी नेसलेल्या व्यक्तीची साडी उतरवून तिला शॉर्टस् मधे दाखवण्यात येणं ही रेपिस्ट मेंटालिटी आहे. जी म्हणते की आता हिला काहीही बोललं तरी चालेल. मी माझ्या मर्जीने शॉर्ट कपडे घातले तर मला ##@** म्हणतील. पण तुम्ही कपडे काढले तर ती सामान्य गोष्ट आहे. देशातले तरुण काय करत आहेत? तर लहान मुली, महिला यांचे न्यूड्स बनवत आहेत. त्यांना कुणाशी मैत्री करायला, बोलायला वेळ नाही. मी ६३ वर्षांची आहे, तुम्हाला माझे न्यूड्स हवेत? जर्क आऊटसाठी? आता वडील मुलांना हेच सांगत असणार की मोठं झाल्यावर तू हवं ते बनू शकतोस आणि मुलं उत्तर देत असतील हो मोठा झाल्यावर मी रेपिस्ट होणार. मला किती वाईट आणि शोषण झाल्यासारखं वाटतंय याची तुम्हाला कल्पना नाही. शिवाय ही समस्या येत्या काळात वाढतच जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फोटोंची बाजू घेणं सोडून द्या, असं सीमा आनंद यांनी म्हटलं आहे.
सीमा आनंद यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?
सीमा आनंद यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही योग्य केलंत, अशा पद्धतीने धाडस दाखवणं आवश्यक होतं असं काही नेटकरी म्हणत आहेत. तीन वर्षांची चिमुरडी असो किंवा ६३ वर्षांची स्त्री, कुणीही सेफ नाही हेच कळतंय. तुम्हाला जर नावं कळली असतील तर ती पण पोस्ट करा मॅडम, लोकांना यांचा चेहरा आणि ओळखही कळूदे असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तुम्हाला सलाम तुम्ही जे बोललात ते योग्य आहे असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. सीमा आनंद यांच्या व्हिडीओवर अशा विविध प्रतिक्रिया येत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.