Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! केमिकलमिश्रित दुधाचा खुलेआम काळाबाजार; प्रशासनाचे दुर्लक्ष, लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका..

Big Breaking! केमिकलमिश्रित दुधाचा खुलेआम काळाबाजार; प्रशासनाचे दुर्लक्ष, लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका..

आर्णी (जि. यवतमाळ) : शहरात केमिकलमिश्रित दुधाचा काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एकही दूध विक्रेता दुधाची कॅन घेऊन डेअरीवर दूध देण्यासाठी येताना दिसत नसताना हजारो लिटर दूध येते कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.

हजारो लिटर दुधाचा पुरवठा करण्याएवढी दुधाळ जनावरे आहेत तरी कुठे, हाही प्रश्न आहेच.

शुद्ध दुधाच्या नावाखाली शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचे दिसून येते. अधिक नफ्यासाठी शहरातील काही दूध विक्रेते दुधात युरिया, डिटर्जंट, स्टार्च व इतर घातक रसायने मिसळून नागरिकांना विकत असल्याची चर्चा आहे. शहरातील काही ठिकाणी सकाळ-संध्याकाळ दूधविक्री होते. भेसळयुक्त दुधामुळे लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींच्या आरोग्याशी खेळ केला जातो.

अशा मिश्रित दुधाच्या सेवनामुळे पोटदुखी, उलटी, जुलाब, यकृत व मूत्रपिंड विकारांसह दीर्घकालीन आजार होण्याचा धोका असल्याचे डॉक्टर सांगतात. दुधाच्या शुद्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून प्रभावी तपासणी होत नसल्याने काळाबाजार करणाऱ्यांचे फावते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी तातडीने दुधाचे नमुने तपासून दोषींवर कारवाई करावी, दूध विक्री दुकानांची नियमित तपासणी व्हावी तसेच मिश्रित दूध विक्री करताना आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जास्त नफा मिळविण्यासाठी भेसळ

कमी दुधातून जास्त नफा मिळविण्यासाठी भेसळखोरी फोफावत आहे. स्टार्च, युरिया एवढेच नव्हे तर डिटर्जंट पावडर वापरून दुधाला फेस आणला जातो. फाँर्मेलिन हे दूध लवकर खराब होऊ नये म्हणून वापरतात. हायड्रोजन पेरोक्साईड हे बॅक्टेरिया मारण्यासाठी वापरतात. यात वापरले जाणारे केमिकल्स मानवी आरोग्यासाठी विषारी असू शकतात. यामुळे पंचनसंस्थेचे विकार, मूत्रपिंडाचे आजार आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.