Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking : बदलापूर पुन्हा हदरले! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचार

Big Breaking : बदलापूर पुन्हा हदरले! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचार


बदलापूर: बदलापूर शहरात अवघ्या काही  महिन्यांपूर्वी झालेल्या शालेय अत्याचाराच्या घटनेची जखम अद्याप ताजी असतानाच, पुन्हा एकदा एका चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्कूल व्हॅनमध्येच हा प्रकार घडल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली बदलापूर पश्चिमेतील एका नामांकित शाळेत शिकते. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती स्कूल व्हॅनने घरी परतत होती. मात्र, घरापर्यंत पोहोचवण्याच्या दरम्यान व्हॅन चालक ‘सुनील’ (बदललेले नाव) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम चालकाने चिमुकलीला मारहाण करून ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती. घरी पोहोचल्यानंतर घाबरलेल्या चिमुकलीने आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या शरीरावरील खुणा आणि तिने दिलेली माहिती ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी वेगाने हालचाली करत नराधम चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.